बांदा
विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या १७ लाॅकर्स कपाटांचे उदघाटन केंद्रशाळा बांदा नं . १ येथे करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात लाॅकर्सचे उद्घाटन सावंतवाडी सभापती निकीता सावंत, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच अक्रम खान, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर केंद्रप्रमुख संदीप गवस, मुख्याध्यापक सरोज नाईक, ग्रामपंचायत सदस्य उमांगी मयेकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत लाॅकर्सचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी तालुक्याच्या नूतन सभापती म्हणून निवड झालेल्या निकीता सावंत यांना शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचा मुख्याध्यापिका श्रीमती सरोज नाईक यांना आदर्श नवदूर्गा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल तसेच मयुरेश रमेश पवार या विद्यार्थ्यांने अॅबॅकस स्पर्धेत राज्यस्तरीय सुयश मिळविल्याबद्दल तसेच इन्सुली नं ५शाळेचे शिक्षक श्री हंसराज गवळे यांनी बांदा शाळेच्या हॉलमध्ये साकारलेल्या चित्राबद्दल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उद्योजिका माधवी प्रवीण गाड यांनी शाळेला डिजिटल वर्गपाट्या व नाना शिरोडकर यांनी शाळेच्या नावाचा उपलब्ध करुन दिलेला डिजिटल बोर्ड याचेही अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
⁰
यावेळी शाळेत लोकसहभागातून होत असलेल्या कायापालट पाहून मान्यवरांनी ग्रामस्थांचे कौतुक केले व पंचायत समिती व जिल्हा परिषद मार्फत शाळेला अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री जे. डी.पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सरोज नाईक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले.