विश्वनाथ समिट 2021च्या राष्ट्रीय चर्चासत्रात मध्ये डॉ. सॅमसंन डेव्हिड यांचे प्रतिपादन
भारतभरातून शोधपत्रांचे झाले वाचन!
तळेरे
तळेरे, येथील मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, के. व्ही पेंढारकर महाविद्यालय डोंबिवली, सिंधु स्वाध्याय संस्था मुंबई विद्यापीठ मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने युनिफेस्ट परिवार दिल्लीद्वारे समर्पित, सेंट झेवीयर कॉलेज मुंबई यांच्या मार्गदर्शना नुसार, रुसाच्या वतीने ‘पर्यावरण: प्रदूषण, कारणे,परिणाम,सदयस्थिती’ या विषयावर एक दिवसीय अर्ध-आभासी राष्ट्रीयचर्चा सत्राचे आयोजन कणकवली तालुक्यातील तळेरे येथील दळवी महाविद्यालयात नुकतेच करण्यात आले होते.
या राष्ट्रीयचर्चा सत्राच्या स्वागत समारंभ प्रसंगी स्वागताध्यक्ष डॉ.फादर केंथ डिसुझा (अध्यक्ष
झेवीयरस कॉलेज मुंबई,), डॉ.अकबर दळवी (समन्वयक सिंधू स्वाध्याय संस्था मुंबई विद्यापीठ), डॉ.प्रमोद पाबरेकर (वरिष्ठ सल्लागार रूसा महाराष्ट्र राज्य),मुख्य अतिथी डॉ. सॅमसन डेव्हिड, माजी सहसचिव भारतीय विश्वविद्यालय संघ, डॉ. विजय जोशी वरिष्ठ मार्गदर्शक, रूसा महाराष्ट्रराज्य, डॉ.माधुरी पेजावार , डॉ.सुर्यकांत येरागी, डॉ.बळीराम गायकवाड, प्र.कुलसचिव मुंबई विद्यापीठ. हे उपस्थित होते.
शिक्षण, असो की पर्यावरण. दळवी महाविद्यालयात नेहमीच नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्या जातात. गतवर्षी कोरोणाच्या महामारीत भारतातील पहिली आभासी राज्यस्तरीय कॉन्फरन्स *विश्वनाथ समिट 2020* चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
यावर्षी राष्ट्रीय पुढीलवर्षी आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रचंड ऊर्जेचे धनी महाविद्यालयाचे आधारस्तंभ, मानद मार्गनिर्देशक श्री. विनायक दळवी यांनी ही संकल्पना महाविद्यालयात रुजविली.
कार्यक्रमाची सुरुवात तळेरे गावच्या सरपंच साक्षी सुर्वे यांनी द्वीपप्रज्वलीत करून केली. डॉ. फादर केंथ डिसुझा यांनी जागतिक शांती निर्माण व्हावी म्हणून प्रार्थना केली तर डॉ.अकबर दळवी यांनी पवित्र कुराणातील आयत म्हणून चर्चासत्राचे प्रास्ताविक केले.
या वेळी बोलतांना डॉ.प्रमोद पाबरेकर यांनी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानचे महत्व सांगितले. “पर्यावरण विषयक समस्या सोडवण्यासाठी हे राष्ट्रीय चर्चासत्र फार महत्व पुर्ण ठरेल”.असे म्हणाले.
श्री.प्रभाकर देसाई. के.व्ही पेंढारकर महाविद्यालय डोंबिवलीचे अध्यक्ष, यांनी अध्यक्षीय भाषणात कोकणातील युवकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले.
डॉ.प्रशांत राव, डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव, यांनी उदघाटन समारंभासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.
डॉ.माधुरी पेजावार, माजी विभाग प्रमुख, सायन्स विभाग मुंबई विद्यापीठ, प्रस्तुतिकरणसत्राच्या उदघाटनपर भाषणात बोलतांना दळवी महाविद्यालयाच्या वेळेच्या प्रबंधाची मिनिट टू मिनिट प्रोग्रामची प्रशंसा केली.
विश्वनाथ समिट 2021साठी भारताच्या विविध भागातून ६० पेक्षा अधिक संशोधन लेखांचे वाचन करण्यात आले.
यासाठी विविध चार ट्रॅक पर्यवेक्षकासह तयार करण्यात आले होते.
समारोप प्रसंगाचे सन्मानीय पाहुणे डॉ. सुर्यकांत येरागी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त यांनी
संशोधकांना गुणवत्तापूर्ण संशोधनाचे महत्त्व स्पष्ट केले.
डॉ.बळीराम गायकवाड यांनी समारोप समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात दळवी महाविद्यालय, के.व्ही पेंढारकर, सिंधु स्वाध्याय संस्था, सेंट झेवीयर कॉलेज व युनिफेस्ट फॅमिली या सर्वांचे आभार वेक्त केले व पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे, असे ते म्हणाले.
आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे सहा.प्रा.नितीन गुरव यांनी केले. उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन सहा. प्रा.नरेश शेट्ये यांनी केले तर, समारोप समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. शरद महाजन के. व्ही. पी महाविद्यालय डोंबिवली यांनी केले. नाविन्यपूर्ण माहिती, संशोधनाने भरलेल्या या विश्वनाथ समिटचा समारोप राष्ट्रगीताने झाला.