You are currently viewing कासार्डे माध्य-व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी मधुकर खाड्ये

कासार्डे माध्य-व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी मधुकर खाड्ये

तळेरे

कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी मधुकर खाड्ये यांची नेमणूक झाली असून पर्यवेक्षक म्हणून विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक नारायण कूचेकर यांची नेमणूक झाली आहे.

सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र नारकर यांच्या उत्कृष्ट कारकीर्दीनंतर विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच प्रशालेचे माजी कनिष्ठ लिपिक,स्कुल कमिटी चेअरमन, स्थानिक व्यवस्था समिती सेक्रेटरी व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य व प्रशालेचे पर्यवेक्षक अशा अनेक पदांचा अनुभव असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले कासार्डे गावचे सुपुत्र मधुकर धोंडु खाड्ये हे प्राचार्य पदी विराजमान झाले आहेत. प्रशालेच्या इतिहासात प्रथमच शाळेचा विद्यार्थी ते त्याच शाळेच्या मुख्याध्यापकपदी विराजमान झाल्याची घटना मुख्या.मधुकर खाड्येंच्या रुपाने घडलेली आहे.

मधुकर खाड्ये यांची कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत प्रथम कनिष्ठ लिपिक म्हणून नेमणूक झाली त्यांनतर १९९२साली बीएड पुर्ण केल्यानंतर शिक्षकी पेशाला प्रारंभ झाला.सन२०१९ मध्ये विद्यालयाच्या पर्यवेक्षक व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पडली.
दरम्यान स्कुल कमिटी चेअरमन व स्थानिक व्यवस्था समिती सेक्रेटरी या संस्थेच्या विविध पदांची धुराही एम.डी. खाड्ये यांनी पेलत यशस्वी वाटचाल केली आहे. १ एप्रिल २०२१ पासून ते प्रशालेच्या सर्वोच्च प्राचार्यपदी विराजमान झाले आहेत. तर मराठी विषयाचे अभ्यासु ,तज्ञ शिक्षक व प्रशालेचे जेष्ठ शिक्षक एन.सी. कुचेकर यांची पर्यवेक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल कासार्डे विकास मंडळ मुंबई चे अध्यक्ष परशुराम माईणकर, मानद सरचिटणीस उपेंद्र पाताडे व सर्व कार्यकारणी पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर व सर्व सदस्य तथा इतर सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.या निवडीबद्दल या दोघांचे सर्व सतरातून अभिनंदन होत आहे.

मधुकर खाड्ये

प्रतिक्रिया व्यक्त करा