संपादकीय…..
वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले अनंत पिळणकर हे सर्वसामान्य नेतृत्व. इतर कोकणी लोकांप्रमाणे शिक्षण पूर्ण करून त्यांनीही मुंबईची वाट धरली आणि चाकरमानी म्हणून नोकरी करू लागले. परंतु समाजकारणाचा पिंड असलेले अनंत पिळणकर फार काळ मुंबईत रमले नाहीत.
समाजकारणाची, गावची आवड २००८ साली पुन्हा मूळगावी खेचून घेऊन आली. गोरगरिबांबद्दल कळवळा असणारे अनंत पिळणकर वेळप्रसंगी रात्री अपरात्री लोकांच्या मदतीला कधीही धावून जातात.
कुर्ली गावात लोकांच्या कल्याणासाठी ते अविरत झटत राहिले. कुर्ली गाव व नवीन कुर्ली वसाहत येथील अनेक प्रश्न त्यांनी सरकारी कार्यालये फिरून तर कधी आंदोलने करून मार्गी लावले. कुर्ली गावातील प्रश्न सोडवतच त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. देवधर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कुर्ली गावातील लोकांचे फोंडा माळरानावर पुनर्वसनाचे प्रश्न, पाणी प्रश्न, स्मशानभूमी तसेच मोफत भूखंड वाटप सारखे प्रश्न त्यानी एकहाती सोडविले. अनेकवेळा अन्यायाविरुद्ध ते कणखर भूमिका घेऊन उभे ठाकले. त्यामुळे चाकरमान्यांच्या अंगात असलेलं शिवसेनेचे रक्त त्यांच्या स्वभावात प्रकर्षाने दिसून आले. गावातील तसेच आजूबाजूला असणाऱ्या गरजूंना मदत करण्याबरोबर कोरोना काळात संसर्ग वाढू नये यासाठी कोरोना योद्धा म्हणून देखील त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे.
शिवसेनेला रामराम ठोकत नंतर त्यांनी मनसे मध्ये प्रवेश केला होता. परंतु तिथे ते फार काळ रमले नाहीत. शिवसेना नेते ते मनसे असा प्रवास करत ते राष्ट्रवादीच्या ताफ्यात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. पक्ष कोणताही असो आपली धडाकेबाज कामगिरी हेच अनंत पिळणकर यांच्या कामाचे तत्व. आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे अनंत पिळणकर सर्वसामान्य लोकांचे नेते बनले आहेत.
दोस्तीसाठी कायपण म्हणणारे अनंत पिळणकर शत्रूसाठी मात्र शहेनशहा बनतात… दोस्ती, मैत्री जपणारे अनंत पिळणकर अन्याय सहन करत नाहीत. अन्यायाविरुद्ध ते पेटून उठतात.
असा हा धुरंदर नेता आज वयाच्या ५२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. संवाद मिडियाकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भावी राजकीय सामाजिक वाटचालीसाठी सदिच्छा.