शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य अमरसेन पुष्पसेन सावंत यांनी दिली शिलाई मशिन..
कुडाळ :
कुडाळ मालवण मतदार संघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस कुडाळ तालुक्यातील शिवसैनिकांनी सामाजिक सांस्कृतिक रोजगाराभिमुख कार्यक्रम व उपक्रम राबवून केला. याचाच एक भाग म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांनी रोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिले.
हुमरमळा (वालावल) गावातील एका कष्टाळू कुटुंबातील कु. हर्षदा संजय मेस्त्री हिला आमदार नाईक यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून ११ हजार रुपयांची शिलाई मशीन देउन रोजगारासाठी प्रोत्साहन दिले. खर तर हर्षदा चे वडील संगीत क्षेत्रातील आवड असलेले. परंतु गेली ३५ वर्षे हुमरमळा गावात छोटी छोटी सुतार काम करता करता हार्मोनियम बनवुन देण्याचा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित आहे. यातच हर्षदाचे शिक्षण जरी झाले असले तरी नोकरीची वणवण असताना गावात टेलरिंग व्यवसाय निवडून सध्या हुमरमळा व परिसरात लेडीज टेलर म्हणून तिला पसंती मिळाली आहे. परंतु तीच्या जवळ शिलाई मशिन ओअरलाॅख, बिडींग ही गरज असलेली मशीन उपलब्ध नव्हती किंवा घेण्यासारखी परिस्थिती नव्हती.
अशातच गावातील अनेक गरजूंना किंवा अडलेल्या महीला किंवा तरुण मुलांच्या कायमच वेळ प्रसंगी धावणाऱ्या सरपंच सौ. अर्चना बंगे यांनी हर्षदाला शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जि. प. कडे पाठवला होता. परंतु सदर प्रस्ताव नामंजूर झाला. त्याच वेळी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाची लगबग सुरू झाली असताना सौ. बंगे यांनी थेट अमरसेन सावंत यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून शिलाई मशीनची मागणी केली.
कायमच मदतीचा हात पुढे असलेल्या अमरसेन सावंत यांनी पण आमदार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आपण शिलाई मशीन देण्याचे कबुल केले. आपण एक हरहुन्नरी तरुणीला व्यवसायधंद्यात उभी केल्याचे समाधान वाटेल आणि ११ हजार रूपये किमतीची शिलाई मशीन हर्षदा ला देण्याचे मान्य केले. त्या नुसार मशीन प्रदान करण्याचा कार्यक्रम हुमरमळ्यातील हर्षदा च्या घरी तिच्या कुटुंबासमवेत केला.
कायमच गोरगरीबांच्या पाठीशी असणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अमरसेन सावंत यांनी आपणांस रोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिल्याने मेस्त्री कुटुंबाने आभार मानले. आपल्या कायम पाठीशी राहणा-या सरपंच सौ. अर्चना बंगे यांचेही विशेष आभार मानले.
यावेळी सरपंच सौ. अर्चना बंगे, शिवसेनेचे अतुल बंगे, श्री रामेश्वर देवस्थान उप सल्लागार उपसमिती अध्यक्ष अमृत देसाई, उपसरपंच स्नेहलदीप सामंत, ग्रामपंचायत सदस्य कांता माड्ये, स्नेहा सामंत, युवासेनेचे उपशाखा प्रमुख संदेश जाधव, राजन कद्रेकर, संजय मेस्त्री व कुटुंब उपस्थित होते.