एप्रिल फुल्ल म्हणताच,
आनंद ओसंडून वाहतो.
खोटं खोटं का होईना,
एक दुसऱ्याला फसवतो.
उद्देश नसतो वाईट,
केवळ आनंद घ्यायचा.
राग दिसला क्षणिक तरी,
चेहरा हसत ठेवायचा.
एखाद्याचं सुख नक्की,
आहे तरी कशात?
हेच दिसतं एप्रिल फुल्लने,
गाली खुललेल्या हास्यात.
मनात होतात गुदगुल्या,
नसतं फसलेल्याचं दुःख.
आवडत्याचा भासही देतो,
क्षणात लाख मोलाचं सुख.
जग डिजिटल झालं तरी,
करतात आजही एप्रिल फुल्ल,
नाकावरचा रागही तेव्हा,
होतो आपोआपच गुल्ल.
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६