मुंबई गृहराज्यमंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक
कोयनानगर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बोटिंग चालू करण्यात यावे, असा आदेश नुकताच गृह विभागाला दिल्यामुळे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी मंत्रालयात गृह विभागाबरोबर सर्व प्रशासकीय अधिकारी वर्गाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोयनेचे काही प्रतिबंधित क्षेत्र वगळणार की, नाही यावरच चर्चा होणार असून यावरच बोटिंगचे भवितव्य ठरणार आहे.
२५ मार्च रोजी श्रमिक मुक्ती दलाने केलेल्या मागणीनुसार मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बोटिंग सुरु करण्याचे आदेश दिले होते. या बैठकीला व्हीसीद्वारे उपस्थित असणाऱ्या गृहराज्यमंत्री देसाई यांनी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात ७ कि.मी अंतरावर बोटिग सुरु करण्याबाबत ८ दिवसात कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.