मसुरे
परब मराठा समाज, मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी परिवहन व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. अनिल परब यांची, तर या संस्थेच्या उपाध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक, डॉ. दीपक परब यांची बिनविरोध निवड मुंबई येथे झालेल्या परब मराठा समाज कार्यकारिणीच्या सभेत करण्यात आली.
मुंबई दादर येथे डॉ. दीपक परब यांच्या अध्यक्षतेखाली परब मराठा समाजाची सभा 27 मार्च रोजी झाली होती. कार्याध्यक्ष जगदीश परब सरचिटणीस जी एस परब, चिटणीस प्रमोद बा. परब, शैलेश परब, कोषाध्यक्ष शरद परब, सदस्य आत्माराम परब, सोमा परब, संतोष परब, सुनिल परब, श्रीकांत परब, प्रतीक्षा परब, अशोक परब, अक्षय परब, अंकिता परब, मिलिंद प्रभू , सत्यवान परब, सुप्रिया परब, प्रवीण परब, आशिष परब, सुदाम परब, डॉ. राम प्रभू , प्रकाश परब, अशोक परब, अशी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.