ओरोस (सिंधुदुर्ग)
किर्लोसजवळ असलेल्या आंबवणे (ता. मालवण) सड्यावर प्राचीन कातळशिल्पे आढळली आहेत; मात्र या निर्जन सड्यावर असलेली ही कातळशिल्पे पोक्लेनसारख्या अवजड यंत्राच्या वावरामुळे धोक्यात आल्याचे पहिल्याच भेटीत आढळल्याची माहिती कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली.
लळीत म्हणाले, आंबवणेच्या सड्यावर कातळशिल्पे असल्याची माहिती मिळाल्यामुळे याठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली.
यात डॉ. सई लळीत व शुभेन्दू लळीत सहभागी झाले. आंबवणे हे गाव जेमतेम साडेतीनशे वस्तीचे छोटेसे गाव गडनदीच्या काठावर वसलेले आहे. कसालहून ओवळीये, हिवाळेतून एक रस्ता शिरवंडे गावातून किर्लोसकडे जातो.