*रानातील भेडल्या माडाच्या सोपांच्या तस्करीतून चिरीमिरी मिळवणाऱ्यांनी मनसेच्या नादी लागू नये..*
*मनसे विभाग अध्यक्ष रामा सावंत यांची शिवसेनेवर खरमरीत टीका*
सिंधुदुर्ग :
आज जिल्ह्यात मनसेचे आक्रमक व अभ्यासू कार्यकर्ते आपल्या सत्ताकाळातील भ्रष्ट कारभाराची जनतेसमोर पोलखोल करतात याची धास्ती घेऊन सत्ताधारी शिवसनेचे काही अतिउत्साही पदाधिकारी सोशल मीडियाच्या माध्यमातून वायफळ बडबड करू लागले आहेत. त्यात माणगाव खोऱ्यातील भुरटे युवा कार्यकर्ते जनतेची कामं करतो म्हणून फुशारक्या मारत हिंडतात, मीडियातून चमकोगिरीचा प्रयत्न करतात मात्र मागील 7 वर्षांच्या सत्ताकाळापासून माणगांव खोऱ्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा आंबेरी नदी पुलाचा प्रश्न, वनसंज्ञेचा प्रश्न सोडवू शकले नाहीत ही खरी वस्तुस्थिती आहे. ज्या माणगांव खोऱ्याने शिवसेनेला मागील 15 वर्षांत भरभरून दिले त्या माणगांव खोऱ्यासाठी शिवसेनेने नेमके काय दिले याचा विचार करून आत्मपरीक्षण करावे. असेच काही दळभद्री सेनेचे कार्यकर्ते आंबेरी नदी पुलासाठी आंदोलनाचे इशारे देतात व वरिष्ठांनी डोळे वटारून बघितल्यानंतर मूक गिळून गप्प बसत “तलवार” म्यान करतात अक्षरशः कीव येते. आपला सत्तेतील कारभार पारदर्शक नाही म्हणूनच मनसेच्या अभ्यासू कार्यकर्त्यांची धास्ती घेऊन फुटीर पदाधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन बदनामीचं षडयंत्र आखण्याचा केविलवाणा प्रयत्न करता आमच्याअशा भुरटेगिरीला महाराष्ट्र सैनिक जुमाननार नाही हे एवढं लक्षात ठेवा.आमच्या नादी लागू नका अन्यथा कसा “धूर” निघेल याची कल्पना ही करू शकणार नाही असा सज्जड दम मनसेचे विभाग अध्यक्ष रामा सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.