You are currently viewing अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी संजय शेडगे….

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी संजय शेडगे….

सावंतवाडी तालुक्याची कार्यकारणी जाहीर; तर सचिवपदी अमोल पाटील…

सावंतवाडी

आंतरराष्ट्रीय शिक्षक संघटनेशी संलग्न असलेल्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुक्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.यावेळी नूतन तालुकध्यक्षपदी संजय शेडगे तर,सचिवपदी अमोल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महिला सेल तालुकध्यक्षपदी वंदना सावंत तर, सचिवपदी तेजस्विता वेंगुर्लेकर याची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे.
जगातील १६७ देशांमध्ये कार्यरत असलेल्या एजुकेशनल इंटरनशनंल या आंतरराष्ट्रीय शिक्षक संघटनेशी संलग्न आहे. महाराष्ट्र शासनाच्या कोडीव संदर्भातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून व शासकीय परवानगीने श्री खानोलकर मंगल कार्यालय मळगाव येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी मोठ्या उत्साहात मेळाव्याद्वारे जाहीर करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब , संयुक्त राज्य चिटणीस श्री देसाई , जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सावंत,शिक्षक पतपेढी संचालक प्रमोद पावसकर, सचिव बाबाजी झेंडे, महिला सेल जिल्हा सचिव मृगाली पालव, महिला सेल अध्यक्षा नेहा सावंत, माजी तालुकाध्यक्ष सुभाष सावंत, माजी सचिव गुरुनाथ राऊळ, केंद्रप्रमुख संदीप गवस, रामा गावडे,अनंत कदम, कवी व मुख्याध्यापक विठ्ठल कदम, अरुण म्हाडगुत,भावना गावडे, नेहा सावंत, जिल्हा कार्यकारणीचे ज्ञानेश्वर सावंत, संतोष रावण, नितीन सावंत,नंदू कवठणकर, नागेश गावडे, सत्यविजय राऊळ आदी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात शिक्षक संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात सावंतवाडी तालुकध्यक्षपदी संजय शेडगे , तालुकासचिव पदी शअमोल पाटील, कार्याध्यक्ष महेश पालव, कोषाध्यक्ष नेहा सावंत, तर उपाध्यक्षपदी महेद्र कोरगावकर, शुभेच्छा गवस, पांडुरंग पाटील, भास्कर गावडे, दत्ताराम सावंत, कृष्णा गावडे, विभागप्रमुखपदी मंगेश देसाई, अवधूत जाधव, राहुल वागधरे, दत्तगुरू कांबळी, संजय बांबूळकर, दशरथ सावंत, अनिल वरक, सहसचिव म्हणून श्रावणी सावंत, दिपक राऊळ, आदिती सावंत, निंगोजी कोकितकर, मोहन पाटील यांची तर प्रशिक्षणप्रमुख पदी महेश सावंत , तंत्रस्नेही विभाग प्रमुख पदी प्रविण देसाई यांची तर प्रसिद्धी विभागप्रमुख पदी कवी मनोहर परब यांची निवड करण्यात आली. तसेच महिला सेल तालुकध्यक्षपदी वंदना सावंत, सचिवपदी तेजस्विता वेंगुर्लेकर, कार्याध्यक्षपदी राधिका परब, कोषाध्यक्षपदी वर्षा गावडे तर उपाध्यक्षपदी सुजाता आडाव, सीमा पंडित, शुभेच्छा सावंत, प्रणिता भोयर यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव बाबाजी झेंडे, सूत्रसंचालन वंदना सावंत व महेश पालव यांनी तर आभार शिक्षक पतपेढी संचालक प्रमोद पावसकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा