You are currently viewing तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करा

तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करा

मालवण मनसेची मागणी; पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

मालवण

कायदा सर्वांसाठी समान आहे.तसा लोकप्रतिनिधींना देखील लागु आहे.सबब आमदार व शस्त्र बाळगल्याप्रकरणी तसेच कोव्हिड१९ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक व सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच महाराष्ट्र साथरोग नियंत्रण १८५७ व महाराष्ट्र कोव्हिड १९ उपाययोजना नियम २०२० योग्य ती चौकशी करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी मालवण पोलीस निरीक्षक यांच्याजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली.

सध्या जिल्ह्यात मा.जिल्हाधिकाचा आदेशाने मार्च १६ पासुन मनाई आदेश पोलिस अधिनियम १९५१ चे कलम दिनांक १५.मार्च रोजी रात्रौ ०.०१ ते दिनांक २९.मार्च रोजी २४.०० पर्यंत लागू आहे.या आदेशात कोणत्याही प्रकारची शस्त्रे स्वतः बाळगणे, वापर करणे यास बंदी आहे तसे केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.परंतु सदर आदेश असताना देखील कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सहकाऱ्यांसोबत तलवारीने आपल्या वाढदिवसाच्या केक कापला.ही बाब अतिशय गंभीर असून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग करणारी आहे. म्हणूनच आपल्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या आमदार वैभव नाईक आणि सहकारी यांच्यावर शस्त्र अधिनियम,महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच मनाई आदेश पोलिस अधिनियम १९५१ चे कलम महाराष्ट्र ३७ (१) (३) तसेच इतर कलमांद्वारे गुन्हा दाखल करावा. तलवारीने केक कापल्याची घटना तुर्भे मुंबई येथे डिसेंबर मध्ये घडली होती.यावेळी शिवसेना शाखाप्रमुख व त्यांच्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी १८ ते २० जणांवर कारवाई देखील केली होती.तर सोलापुरातील सांगोला येथेही ११ जणांवर तलवारीने केक कापल्यामुळे फेब्रुवारीतही कारवाई झाली होती.सिंधुदुर्ग पोलिसांनीही अश्या प्रकारची करवाई करावी.

वाढदिवस कार्यक्रम तलवारीने केक कापत असताना आमदार वैभव नाईक व सहकार्‍यांच्या तोंडावर मास्क नाही, सोशल डिस्टंसिंग पाळले गेले नाही म्हणजेच राज्य शासनाच्या कोव्हीड१९ आदेशाचे ही उल्लंघन केले आहे.या कोव्हीड नियमाचा आदेश जिल्हाधिकारी,सिंधुदुर्ग यांनी दिनांक १६ मार्च रोजी काढला आहे. कायदा सर्वाना समान आहे त्यामुळे आमदार वैभव नाईक व सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मालवण मनसे च्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी मनसे तालुकाअध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हा अध्यक्ष अमित इब्रामपूरकर, महिला शहर अध्यक्षा भारती वाघ, तालुका उपाध्यक्षा राधिका गावडे, गुरु तोडणकर, विजय पेडणेकर, दिनेश कदम, गोपाळ शेलटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा