सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा…
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,ना.एकनाथ शिंदे, खा.विनायक राऊत,ना. उदय सामंत यांनी फोनवरून दिल्या शुभेच्छा..
सिंधुदुर्ग :
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख व कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस शुक्रवार २६ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांनी फोनवरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार राजन साळवी,आमदार रमेश कोरगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, त्याचबरोबर राजकीय पक्षातील नेते, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, मित्रपरिवार व कुटुंबियांकडून आमदार वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत अभिष्टचिंतन करण्यात आले. कोरोना आजाराचे संकट कायम असल्याने साध्या पद्धतीने कोरोनाचे नियम पाळून वाढदिवस साजरा करण्यात आला.
शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने कणकवली शिवसेना शाखेत आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले व तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांना व शाळांना थर्मलगन व ऑक्सिमिटर मशीनचे वाटप करण्यात आले. आ.वैभव नाईक यांनी प.पू भालचंद्र महाराज, व श्री देव स्वयंभू मंदिरात दर्शन घेतले.
जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आ.वैभव नाईक नेहमीच आघाडीवर असतात गेल्या वर्षी त्यांनी जिल्ह्यात प्रथमच दिव्यांगांसाठी चारचाकी स्कुटरचे वाटप केले. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही वाढदिवसानिमित्त त्यांच्यामाध्यमांतून कुडाळ व मालवण शिवसेना शाखा येथे दिव्यांगांना एकूण 17 चारचाकी स्कुटरचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर कुडाळ शहरातील सार्वजनिक ठिकाणांकरिता थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले.
कुडाळ शहरातील सफाई कामगार व रुग्णालयात सेवा देणाऱ्या मावशी यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. कुडाळ शहर युवासेनेच्या वतीने पोलीस भरती प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. बँकिंग परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. आ.वैभव नाईक यांच्या निधीतून उभारलेल्या कुडाळ पडतेवाडी येथे एसटी बस निवराशेडचे उद्घाटन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त कुडाळ शहरवासीयांच्या वतीने जेष्ठ नागरिकांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार घालून आ.वैभव नाईक यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यांनतर आनंदाश्रय अणाव येथे आमदार वैभव नाईक यांनी निधी मंजूर केलेल्या विहिरीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
सायंकाळी शिवसेना शाखा मालवण येथेही मालवण तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मालवण तालुक्यातील अपंग लाभार्थ्यांना चारचाकी स्कुटरचे वाटप व मच्छीमार महिलांचा सत्कार करण्यात आला. रात्रौ विजयभवन कार्यालय कणकवली येथे आ. वैभव नाईक यांनी उपस्थितांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या.