You are currently viewing कृषी कार्यालय शेतकऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी हव…

कृषी कार्यालय शेतकऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी हव…

कुडाळ

कुडाळ तालुक्याचे कृषी कार्यालय शेतकऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी स्थलांतरित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाताडे यांनी कृषी अधिकारी रमाकांत कांबळे यांच्या जवळ निवेदनाद्वारे केली आहे.

कुडाळ तालुक्याचे कृषी कार्यालय तहसील कार्यालयाच्या आवारात होते मात्र ते सध्या शहरांमध्ये माठेवाडा या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांनी कृषी अधिकारी यांना निवेदन दिले यावेळी राष्ट्रवादी  युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाताडे तसेच कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष सर्वेश पावसकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजू धार पवार, जिल्हा चिटणीस सनी मोरे, इजीलो पिंटो, अमर धोत्रे, प्रतीक सावंत, सुमेध सावंत, राजेंद्र कोठावळे, अभिजित पवार व अन्य पदाधिकारी राष्ट्रवादीचे उपस्थित होते.

सध्या आपले तालुका कृषि कार्यालय माठेवाडा येथे आहे. यापूर्वी तालुका कृषि कार्यालय शासकिय इमारतीमध्ये होते. तेव्हा शेतकऱ्यांची सर्व कामे एकाचवेळी तहसिलदार कार्यालय, भुमि अभिलेख कार्यालय, प्रांत ऑफीस कार्यालय, जनावरे दवाखाना इत्यादी कार्यालयातील कामे एकाच ठिकाणी होत होती. परंतु सध्या हे कार्यालय खाजगी जागेत माठेवाडा येथे गेल्याने ब-याच शेतकऱ्यांना व अन्य लोकांना हे आत असल्यामुळे व माहिती सुध्दा नसल्यामुळे ते शोधून पण सापडत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी-यांना नाहक हेलपाटे पडत आहेत. तसेच सदर जागेमध्ये फोन केला असता नेटवर्क नसल्यामुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कार्यालय माहित नसून व तसा संपर्क होत नसल्यामुळे शेतकरी व अन्य लोकांना मोठा त्रास होत आहे. व अशा तक्रारी राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांकडे आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाला त्रास होवू नये म्हणून तालुक्याचे कार्यालय पुन्हा शासकीय इमारतीत किंवा कुडाळ शहरातील दर्शनी भागात किंवा लोकांच्या सोयीच्या दृष्टीने पडेल अशा ठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस युवक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा