You are currently viewing केंद्र सरकारच्या तीन कृषी विरोधी कायद्याचा व इंधन दरवाढीचा निषेधार्थ राष्ट्रीय काँग्रेस कणकवलीचे उपोषण

केंद्र सरकारच्या तीन कृषी विरोधी कायद्याचा व इंधन दरवाढीचा निषेधार्थ राष्ट्रीय काँग्रेस कणकवलीचे उपोषण

कणकवली
आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कणकवली तालुका कमिटीच्या वतीने सकाळी 11 ते 4 तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर उपोषण करण्यात आले. हे उपोषण दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी बांधवांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी व इंधन दरवाढ कमी करण्यासाठी केले आहे.

तरी केंद्राने तीन कृषी कायदे रद्द करावेत व महागाई कमी करावी अशी आमची मागणी आहे तरी आमची मागणी केंद्र सरकारकडे पोहोचवण्यात यावी, अशी विनंती  तहसीलदार कणकवली यांना करण्यात आली.

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, महेंद्र सावंत जिल्हा सरचिटणीस, कणकवली तालुका अध्यक्ष प्रदिप मांजरेकर, कणकवली शहराध्यक्ष महेश तेली, कणकवली तालुका सरचिटणीस प्रवीण वरूनकर, युवक अध्यक्ष निलेश तेली, प्रदीप तळगावकर, प्रमोद घाडीगावकर, निलेश मांलाडकर,परेश एकावडे, प्रदीप कुमार जाधव, संदीप कदम व पंढरी पांगम व अन्य काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा