किनळे बस सुरू करण्यासोबत कंडक्टरच्या भूमिके विरोधात नाराजी…
सावंतवाडी
किनळे येथे जाणारी एसटी बस तात्काळ सुरू करण्यात यावी,या मागणी बरोबर विद्यार्थ्यांची तक्रार थेट महाविद्यालय प्रशासनाकडे करणाऱ्या कंडक्टरच्या विरोधात आज येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.मुलींची मागणी लक्षात घेता तात्काळ बस सुरू करणे गरजेचे आहे.अशी मागणी करण्यात आली.तसेच महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार करणाऱ्या त्या कंडक्टरला यावेळी पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले.तक्रार करायची होती,तर तुमच्या वरिष्ठांकडे केली पाहिजे होती.थेट पालकांकडे किंवा महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार करणे चुकीचे आहे.असे यावेळी संतप्त पदाधिकाऱ्यानी सांगितले.
दरम्यान झालेल्या प्रकाराबद्दल आपण दिलगीर व्यक्त करतो,परंतु त्या विद्यार्थिनींनी सुद्धा आपल्याला उद्धट उत्तरे दिली. असे त्या कंडक्टरसह एसटीच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे.आज याबाबत शहर अध्यक्ष अजय गोंधावले यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी केतन आजगावकर नगरसेवक आनंद नेवगी,दिपाली भालेकर,परिणिता वर्तक,अमित परब,बंटी पुरोहित,मेघना साळगावकर, संदेश टेमकर आदी उपस्थित होते.