You are currently viewing दप्तराचे ओझे यंदा नक्की कमी होणार

दप्तराचे ओझे यंदा नक्की कमी होणार

ओरोस

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या सलग तीन वर्षांच्या प्रयत्नाने यंदा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे नक्की कमी होणार आहे. यासाठी दोन कोटी रुपये निधिची आर्थिक तरतूद करण्यात आली असून मोठी पटसंख्या असलेल्या 748 शाळांना “पॉल्युमर लॉकर्स’ देण्यात येणार आहेत.

गेली तीन वर्षे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना लॉकर्स देवून त्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षण विभागाने ही नाविन्यपूर्ण योजना आणली. यासाठी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेत मान्यता देत एक कोटी रुपये निधी मंजूर केला; परंतु पहिल्या वर्षिच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा