You are currently viewing राज्यात २६ हजार हेक्टरवरील पिके नष्ट ; अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

राज्यात २६ हजार हेक्टरवरील पिके नष्ट ; अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

पुणे

ऐन उन्हाळ्यात राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आतापर्यंत २६ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांची हानी झाल्याचा अंदाज कृषी खात्याने वर्तविला आहे. १८ ते २१ मार्च या चार दिवसांमध्ये राज्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये पिकांना फटका बसला आहे.

अमरावती, नागपूर, बुलडाणा, नाशिक, जळगाव आणि अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याचे सांगितले जात आहे. या जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर व चंद्रपूर भागात गारपिटीमुळे कमी नुकसान झाले आहे. बहुतेक जिल्ह्यात काढणीला आलेल्या गहू आणि हरभरा पिकाचेच नुकसान मोठया प्रमाणात झालेले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा