पाण्याच्या वेगवेगळ्या स्रोतामुळे सर्वच समुद्र एकमेकांशी जोडले गेलेले आहे. मौन्सूमच्या निर्मितीमध्ये समुद्राचा वाट मोठ्या प्रमाणात आहे.
सध्या संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगशी झुंज देत आहे. अनेक नैसर्गिक घटकांवर याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळत आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनने दिलेल्या अहवालानुसार समुद्राचा पापं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अटलांटिक मेरिडिओनल ओवरटर्निंग सर्कुलेशनचा (एमॉक) वेग १६०० वर्धीत सर्वाधिक कमी नोंदविला गेला आहे. प्रत्येक देशाला वेगवेगळ्या समुद्रकिनारा लाभलेला आहे. माणसाने त्यांची ओळख पटण्यासाठी वेगवेगळी नावे दिली आहे, परंतु निसर्गासाठी समुद्र हा एकच आहे.
युरोप आणि कानाडा यांच्यामध्ये अटलांटिक महासागरात दक्षिण आणि पूर्व समुद्रामार्गे गरम पाण्याचा प्रवाह पोहोचतो आणि त्यामुळे मोठ्याप्रमाणात हिमनग वितळत आहे. याचाच परिणाम संपूर्ण ऋतूचक्रावर होतोय. विशेषतः भारतात या कारणामुळे मौन्सूमचा कालावधी कमी होऊ शकतो असे अभ्यासकांचे मत आहे