जिंदाल फाऊंडेशनने दिली दिव्यांग भावेशला व्हीलचेअर…

जिंदाल फाऊंडेशनने दिली दिव्यांग भावेशला व्हीलचेअर…

बाळासाहेब पाटील यांचे प्रयत्न; दोन वर्षाची प्रतीक्षा संपुष्टात

वेंगुर्ला

आरवली-सोन्सुरे येथील दिव्यांग बांधव भावेश दिलीप कावळे हा त्याची व्हीलचेअर पूर्णतः खराब झाल्याने गेली दोन वर्षे तो जमिनीवरच पडून असायचा. सदर घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी रोटरी क्लब ऑफ मुंबई, गोरेगांव पश्चिमचे माजी अध्यक्ष पुष्कराज कोले व बापू गिरप यांच्या सहकार्यातून जिदाल फाऊंडेशनतर्फे भावेश याला व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. यावेळी आरवली सरपंच तातोबा कुडव, ग्रामपंचायत सदस्य सायली कुडव, सामाजिक कायकर्ते लक्ष्मीकांत कर्पे, पप्पू चिपकर, महादेव नाईक व दिपाली कावळे उपस्थित होते. आत्तापर्यंत रोटरी क्लब ऑफ मुंबई. गोरेगांव पश्चिम यांचे वतीने व जिंदाल फाऊंडेशनच्या मदतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १८०० अपंग बांधवांना मोफत कृत्रिम साहित्य मोफत वाटप केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा