You are currently viewing गणेश चतुर्थी निमित्त येणाऱ्या चाकरमान्यांना आरोग्य प्रशासनाची वेगळीच भेट…
होम क्वारंटाईनच्या शिक्यामुळे हातावर उठले फोड : करूळ चेक नाक्यावरील संतापजनक प्रकार....

गणेश चतुर्थी निमित्त येणाऱ्या चाकरमान्यांना आरोग्य प्रशासनाची वेगळीच भेट…

होम क्वारंटाईनसाठी हातावर मारण्यात येणाऱ्या शिक्यातीत शाही बनावट असल्याची धक्कादायक बाब करूळ तपासणी नाक्यावरती उघडकीस आली आहे. गणेश चतुर्थीनिमित्त येणाऱ्या चाकरमान्यांच्या हातावर बनावट व एँसिडयुक्त शाहीचे शिक्के मारण्यात आल्याने त्या चाकरमान्यांच्या हातावर मोठे फोड व अँलर्जी आली आहे. या गंभीर घटनेचे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.
एडगांव इनामदारवाडी येथील सुबोध रावराणे यांचे कुटुंबीय मुंबई वरून आले. आलेल्या तीनही प्रवाशांनी कोरोना टेस्ट केली होती. त्यांचे रिपोर्ट ही निगेटिव्ह होते. तसेच ई- पास घेवून त्यांनी रितसर प्रवास केला. करूळ चेक नाक्यावर तैनात असलेल्या आरोग्य पथकाकडे त्यांनी आपल्याजवळील सर्व कागदपत्रे दाखवली. तरीही तुम्हाला होम क्वारंटाईन व्हावे लागेल असे सांगण्यात आले. त्या प्रवाशांबरोबर पथकातील काही कर्मचाऱ्यांनी हुज्जत घालत उलटसुलट उत्तरे दिली. त्यात एँसिडयुक्त शिक्का मारून त्यांना गणेश चतुर्थीची भेट दिली आहे. त्या तीनही प्रवाशांच्या हातावरील फोड व अँलर्जीचे प्रमाण वाढत आहे. चाकरमान्यांना त्रास देणाऱ्या अशा मग्रूर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व ती बनावट शाही वापरू नये, अशी मागणी श्री. रावराणे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा