*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पणती*
उजळून जाईन सारीच वाट
एक तरी पणती इथेच लाव
होईल अज्ञाताला ही ज्ञात
कुण्या नावाचं कुण्या माणसांचं हे गांव
एक तरी पणती इथेच लाव
देईन स्वप्नांना आकार खास
भव्य दिव्य स्वप्नांची ही वाट
एक तरी पणती इथेच लाव
इथेच घडवू सुनिल क्षेत्री, ध्यानचंद खास
नको शहरांची ती मळखाऊ वाट
एक तरी पणती इथेच लाव
इथेच घडवू तेंडल्या, विराट बिनबोभाट
नकोच तावदाने तुटण्याची मग बात
एक तरी पणती इथेच लाव
नको टॉवर्स नको माणसांची गर्दी नि घाम
इथेच धरु विकासाची वाट
एक तरी पणती इथेच लाव
धरली शहरांची साऱ्यांनीच वाट
पणती लावण्या तरी राहू दे एक थरथरता हात
एक तरी पणती इथेच लाव
—-राजा जोशी
9823687519
०७ नोव्हेंबर २०२६
