You are currently viewing दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांनी आर्थिक समृद्धी साधावी – भालचंद्र साठे

दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांनी आर्थिक समृद्धी साधावी – भालचंद्र साठे

दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांनी आर्थिक समृद्धी साधावी – भालचंद्र साठे

रवळनाथ दुग्ध संस्थेकडून २ लाख ६० हजारांचा दिवाळी बोनस वितरित; ६३ दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३ रुपये बोनस

वैभववाडी

शेतीपूरक व्यवसायांमध्ये दुग्ध व्यवसायाला पूर्वीपासूनच महत्त्वाचे स्थान आहे. दुग्ध व्यावसायिकांनी एकत्र येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि या व्यवसायाची अधिक प्रगती साधावी, असे आवाहन भाजप नेते भालचंद्र साठे यांनी केले.

भुईबावडा येथील रवळनाथ सहकारी दुग्ध व्यवसाय संघाच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आले. संस्थेचे वार्षिक दूध संकलन सुमारे ८५ हजार लिटर असून, एकूण ६३ शेतकरी संस्थेला दूध पुरवठा करतात. यंदा शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३ रुपये दराने बोनस देण्यात आला. एकूण २ लाख ६० हजार रुपयांच्या बोनसचे वितरण करण्यात आल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली.

यंदाच्या अतिरिक्त दूध संकलनात उज्वला उदय मोरे, सुरेश गंगाराम गुरव आणि संतोष बळीराम विचारे यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले.

यावेळी भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे यांनी शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलून अधिकाधिक जनावरे पाळावीत. दुग्ध व्यवसायाकडे केवळ पूरक व्यवसाय म्हणून न पाहता स्वतंत्र व्यवसाय म्हणून पाहून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाला भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे, रवळनाथ सहकारी दुग्ध व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष अरुण अमृत मोरे, उपाध्यक्ष प्रशांत बाळू मोरे, सचिव रवींद्र बिले, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर मोरे, सदस्य शांताराम देसाई, विलास रेडिज, आकोबा मोरे, संतोष विचारे, उज्वला मोरे, सानिका मोरे, ऐनारी गावचे पोलीस पाटील श्रीकृष्ण विचारे, विश्वनाथ राणे, जयसिंग घुगरे,

प्रतिक्रिया व्यक्त करा