You are currently viewing ‘राज्यसेवा’ परीक्षेवर सीसीटीव्हीचा वॉच

‘राज्यसेवा’ परीक्षेवर सीसीटीव्हीचा वॉच

कोल्हापूर

रविवारी (दि. 21) होणार्‍या राज्यसेवा पूर्व परीक्षेवर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. परीक्षा होणार्‍या प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबतचे आदेश दिले आहेत.

कोरोना आणि मराठा आरक्षण प्रश्नांवर राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोनवेळा पुढे ढकलली. गेल्या रविवारी (दि. 14) होणारी परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती. याविरोधात राज्यभर विद्यार्थ्यांनी उद्रेक केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परीक्षा रविवार, दि. 21 रोजी होईल, असे जाहीर केले.

रविवारी कोल्हापुरात 41 केंद्रांवर सुमारे 14 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

या परीक्षेसाठी या केंद्रावरील 531 खोल्यांचा वापर केला जाणार आहे. या सर्व खोल्यांत सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी दोन तास अगोदर केंद्रांवर उपस्थित राहावे लागणार आहे. तापमान तपासणी करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ताप असलेल्या तसेच कोरोनासद़ृश लक्षणे असणार्‍या विद्यार्थ्यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाणार आहे.

एकाच दिवशी दोन परीक्षा

राज्यसेवा पूर्व परीक्षेबरोबर त्याच दिवशी (रविवार, दि. 21) रेल्वेचीही परीक्षा होणार आहे. यामुळे दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − six =