You are currently viewing बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २२ ते २६ मार्च ला कुडाळ येथे मार्गदर्शन शिबिर

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २२ ते २६ मार्च ला कुडाळ येथे मार्गदर्शन शिबिर

*स्थानीय लोकाधिकार समिती व आ. वैभव नाईक यांच्या वतीने आयोजन*

कुडाळ :

सारस्वत बँकेची  होऊ घातलेली  स्टाफ भरती तसेच बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी  स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने परीक्षा पूर्व तयारीसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन शिबीर सोमवार २२ मार्च ते  शुक्रवार २६ मार्च २०२१ रोजी सकाळी १० ते सायं  ५ वा. पर्यंत कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी कुडाळ येथे होणार आहे.

सारस्वत कॉ. ऑप. बँकेच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, गोवा कर्नाटक, आणि गुजरात येथील शाखांमध्ये १५० कनिष्ठ अधिकारी मार्केटिंग व ऑपरेशन्स लिपिक संवर्ग या पदांकरिता भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. यासाठी ०३ एप्रिल २०२१ रोजी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. तसेच इतरही बँकांच्या भरती परीक्षा घेतल्या जातात त्या बँकिंग परीक्षांच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हयातील  विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्व तयारीसाठी आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने हे  मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

राज्यातील बँकिंग क्षेत्रातील नामवंत प्राध्यापक ओंकार तपकीर, प्रा. समीर इनपुरे, प्रा.अक्षय गौड, प्रा.अमित सरवंडे  हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे पदाधिकारी उमेश नाईक, अनंत भोसले, श्रीराम विश्वासराव, सुधाकर नर, विलास जाधव उपस्थित राहणार आहेत. तरी या मार्गदर्शन शिबिरासाठी इच्छुकांनी आपली नाव नोंदणी अक्षय पावसकर मोबा. ८२७५६२८८२८ यांच्याकडे  करावी व मार्गदर्शन शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा