You are currently viewing पौर्णिमा शरदातली

पौर्णिमा शरदातली

*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पौर्णिमा शरदातली*

 

आज आली शारदीय पौर्णिमा,

क्षितिजावर झळकेल शुभ्र चंद्रमा,

डोळ्यात मावणारा आकाशाचा तुकडा,

निळा रूपेरी प्रकाशात न्हायलेला,

चमचमत्या तारकांचा जल्लोष रांगडा,

अंगणात फुलती कूंद जाईजुई,

सुगंधाची बेटे ठाईठाई,

धरतीच्या अंगावर दुल ई चांदण्याची

वृक्षवेलींवर विणकाम तरंगे चांदण छायांचे,

मंदिर चांदण्याचे, दिपमाळ चांदण्याची,

आंत लक्ष्मीमाता लावण्यखनी चांदण्याची,

टिपूर चांदण्यात हंसती शुभ्र कुमूदिनी,

सरोवरी आरशात बघे बाळ मुरडोनी,

पाकोळ्या ल्यायल्या चांदणे,

रस्तोरस्ती डोंगरमाळ रानेवने गोंजारती चांदणे,

सृष्टी तिच आज रूप सजवले,

अंगडे टोपडे तृणांनी चांदणं ल्यायले.

दुध साखरेत केशर तरंगले,

मैत्र पुनव आज दुधाच्या पेल्यात खेळली.

शृंगार दाराआड ऊभा ,

कवटाळी चांदण रश्मीला,

सर्वांच्या वदनी नाचली पौर्णिमा शरदातली.

प्रसन्न लक्ष्मीमाता हंसत विचारिते,

‘को… जागर्ती.. को.. जागर्ती.

देणं नक्षत्रांचे घेऊन हाती ,

महालक्ष्मी हंसत ऊभी क्षितिजावरती.

बहरले आनंदाचे ताटवे,

हास्याचे ऊंच ऊंच झुलती स्वप्न झुले.

 

अनुराधा जोशी

अंधेरी. मुं. ६९

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा