You are currently viewing ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेचे कथालेखिका नांदी संमेलन 1 नोव्हेंबर ला पुणे येथे संपन्न होणार

‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेचे कथालेखिका नांदी संमेलन 1 नोव्हेंबर ला पुणे येथे संपन्न होणार

संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका डॉ.मंगला वैष्णव

पुणे :

महाराष्ट्र साहित्य परिषद,समर्थ युवा फाउंडेशन, मराठी भाषा विभाग आणि ‘आम्ही सिद्ध लेखिका संस्था ‘ या़ंच्या समन्वयाने दि. 1 नोव्हेंबर 2026 रोजी पेरूगेट येथील प्र. ल.गावडे सभागृहात राज्यस्तरीय कथालेखिका नांदी संमेलनाचे नियोजन ‘आम्ही सिद्ध लेखिका ‘ या संस्थेने केले आहे.

या संमेलनास संस्थेच्या विदर्भ,मराठवाडा,खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, पुणे आणि मध्यप्रदेशातील 200 कथालेखिका सहभागी होणार आहेत.

सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका डॉ. मंगला वैष्णव या़ंच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या या संमेलनास उद्घाटन सत्रात उद्घाटक डॉ. स्वाती महाळंक, प्रमुख पाहुण्या डॉ. छाया महाजन, विशेष मान्यवर सन्मा. वृ़ंदा दिवाण तसेच ‘मसाप’ विश्वस्त डॉ.माधवी वैद्य आणि अध्यक्ष मा. योगेश सोमण उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यत संपन्न होणा-या या संमेलनात

*मुलाखत*, *कथाकथन*, *परिसंवाद*, *कथाअभिवाचन* , *समारोप सत्र*

अशा भरगच्च साहित्यिक कार्यक्रमाचे नियोजन केले असून सन्मा. रेखा बैजल( मुलाखत)प्रा. ललिता गादगे( कथाकथन)

सन्मा. विजया ब्राह्मणकर( परिसंवाद)प्रा. लीला शिंदे( कथाअभिवाचन)

मा. अंजली कुलकर्णी ( समारोप) या मान्यवर विविध सत्राच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध सत्रात विविध मान्यवर कथालेखिका सहभागी होणार आहेत.

संस्थेच्या समग्र विश्वस्त, सल्लागार, पदाधिकारी आणि पुणे शाखा हे संमेलन दर्जेदार करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अशी माहिती संस्था अध्यक्ष प्रा. पद्मा हुशिंग यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा