बांदा
चालकाचा ताबा सुटल्यामुळे तब्बल दोन वेळा पलटी होऊन कुडाळ येथील डंपरला अपघात घडला आहे.यात दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना आज नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली कोठावळे-बांध येथे घडली.
सुजित सिंग आणि चंदन सिंग अशी जखमींची नावे आहेत.त्यांना अधिक उपचारासाठी बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच स्वामी सोहीरा ॲम्बुुलन्स चे अमरजीत कोठावळे आणि सुजय कोठावळे यांनी जखमींना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.