अवैध व त्रासदायकपणे प्राण्याची वाहतूक करण्याच्या प्रकरणात
संशयितास जिल्हा सत्र न्यालायाद्वारे जामीन मंजूर
अॅड. अशपाक शेख यांनी पाहिले काम
कुडाळ
संशयित आरोपी क्र. १ ते ३ यांनी एकमेकांच्या संगनमताने बोलेरो पिकअप गाडी नं. एमएच-०९/सीए-५४०२ मध्ये दि.०३.१०.२०२६ रोजी २१.०० वाजताच्या मानाने व मौजे सुंदरवाडी, वाडीवरवडे येथे कुडाळ ते वेंगुर्ला जाणारे रोडवर ता. कुडाळ येथे श्री. तालीब हमीद शेख याने आपल्या ताब्यातील बलेरो पिकअप गाडी नं. एमएच ०९ सीए – ५४०२ मध्ये संशयित आरोपी क्र. ०२ अख्त्यार इब्राहिम खान याने विकत घेतलेला तपकिरी रंगाचा बैल बलेरो पिकअप गाडीत बंदिस्थ स्थितीत वेदना होईल अशा रितीने त्याचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयपणे बांधुन दारुच्या नशेत बेदरकारपणे व धोकादायकपणे चालवून फिर्यादी याचे अंगावर घालण्याची कृती केली. परंतु फिर्यादी याने मागे सरकुन स्वतःस वाचविले म्हणूनचा गुन्हा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्रमांक- ३३२/२०२६. अन्वये भारतीय न्याय संहिता कलम -११०,२८१,३ ( ५ ) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम- ११ (१)(a), ११(१)(d),११(e),११ (१) (h) आणि मोटर वाहन कायदा कलम १८४, १८५,६६ / १९२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास दिनांक दि.०६.१०.२०२६ रोजी १३.१७ वाजता करण्यात आली होती.तद्नंतर आरोपी क्र. 02 यास अटक होऊन न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली दरम्यान आरोपी क्र. ०२ यांनी जिल्हा सत्र न्यायालायात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावरील सुनावणीनंतर मा ओरोस येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश-०१ श्री. एस.टी.त्रिपाठी साहेब यांनी दिनांक १५/१०/२०२६ रोजी आरोपीची रुपये ५०,०००/- च्या जामिनावर व अटी-शर्तींसह मुक्तता करण्याचा आदेश दिला. आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले असून अॅड. नामदेव फ. मठकर, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख ॲड. भूषण कदम, अॅड. हरेश म. वरावडेकर व अॅड. आसिम नि. मुजावर यांनी सहाय्य केले.
