*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दहीवडा*
********
मग दहीवडा म्हणे तो मसी
माझी गं कृती का न सांगसी
थांब जरा तू विचार करते
नीट सांगण्या शब्द शोधते
आता ऐका कृती सांगते
लक्ष नीट द्या परत न सांगे
उडद डाळ घ्या वाटीभर ती
धुवून ठेवा रात्री मग ती
सकाळ होता नीट रूबवा
पसरट भांड्या मध्येच घाला
फेटायाला मग करा सुरू
फेटत फेटत मग हवा भरू
मीठ जरासे त्यातच घाला
कढईमध्ये मग तेलाला
ठेवा आता ते उकळाया
आच जराशी कमी करुया
वडे लागले लाल व्हावया
उतरा ठेवा गार कराया
पाण्यासाठी दुसरे भांडे
घाला आता त्यामधे वडे
वेळ जरासा जाऊ द्यावा
दाबून हळू तो काढावा
आता करुया सिद्ध दह्याला
साखर घालू घुसळू त्याला
ताटलीत घ्या दही वड्याला
मिरपूड वरी च्याट मसाला
सजली थाळी द्या सार्यांना
कापूस वडे सारे खाना
विद्या रानडे ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
