*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*करून बसले मत चोरी*
सहज पाहून पिवळी साडी
विचार येतात हजार मनात
आपण न राहिलो आपले
जिंकून बसले व्यापारी क्षणात
//1//
रंग हवा तो उतरवून गळी
गळ्यात बांधले *नऊ रंग*
कुठे न लिहिले ग्रंथामधे
अमूक रंगाने होतो बेरंग
//2//
फॅड रंगांचे वाढू लागले
परवडत नाही जरी तरी
उसने घेऊन नेसून येते
आमची बाई नऊ वारी
//3//
सज्ञानींसह अज्ञानी चळले
रंग बदलतात सरड्यापरी
सखी नाचते म्हणून ठकी
पैसे उधळते साड्यांवरी
//4//
कुठे नेणारे फॅशन आता
निर्णय घेतात व्यापारी
परिधान करती वस्त्रे स्त्रिया
*करून बसले मत चोरी*
//5//
विनायक जोशी 🖋️ठाणे
1510/9324324157
