You are currently viewing विनामास्क फिरणाऱ्या  84 जणांवर दंडात्मक कारवाई

विनामास्क फिरणाऱ्या  84 जणांवर दंडात्मक कारवाई

सिंधुदुर्गनगरी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोवीडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 84 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

       यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात 44 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 8 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला असून,  पोलिसांनी 40 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 12 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर काल दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम 21 हजार 300  रुपये इतकी आहे.

       त्याशिवाय जिल्ह्यातील नगर पालिका प्रशासनाकडून एकूण 38 ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून,कुठल्याही ठिकाणी कोवीडच्या नियमांचे उल्लंघन होत नसल्याचे दिसून आले.

       कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरीकांनी कोवीडच्या नियमांचे पालन करावे. तसेच मास्क, हॅन्ड सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा