सावंतवाडी
होळी आणि रंगपंचमी या उत्सवांच्या वेळी होणार्या अपप्रकारांना आळा घालण्यात यावा, तसेच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेउपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन हिंदुजनजागृती समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड, वेंगुर्ले, येथे पोलीस आणि तहसीलदार यांना देण्यात आले.
होळीहादुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचारनष्ट करण्याचा उत्सव आहे; मात्र सध्या या उत्सवांत अनेक अपप्रकारांनी शिरकाव केला आहे. मद्यपान करणे, महिलांकडे बघून अंगविक्षेप करणे, घातक रंगांची होळी खेळणेआदी अपप्रकार केले जातात. यामुळे महिला, वृद्ध नागरिक, लहान मुले यांना घराबाहेर पडणे कठीण बनलेआहे. या उत्सवांचे पावित्र्य राखणे, तसेच महिलांना सुरक्षित वाटावे, रासायनिक रंगांची विक्री होऊ नये, यासाठी पोलिसांनी गस्ती पथके कार्यरत ठेवावीत, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या काळात अशी कृत्ये करणाऱ्या तरुणांना त्वरित ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
या बरोबरच प्रबोधनपर हस्तपत्रकांचे वितरण करणे, सामाजिक संस्थांच्या साहास्याने चळवळी राबवणे आदी जनजागृती करणाऱ्या उपाय योजना कराव्यात.’कचऱ्याची होळी, या पर्यावरणास घातक असलेल्या संकल्पना राबवू नये, यासाठी तसेच चांगल्या वृक्षांच्या फांद्या न तोडता धर्मशास्त्र समजून होळी करावी.
सध्या “कोरोना” विषाणूच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना रंग लावल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे धुलीवंदन आणि रंगपंचमी या दिवशी जसे शिवजयंतीसह विविध उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते, त्यानुमार प्रशासवाने कठोर निर्बंध घालावेत, तसेच चिनी रंग, पिचकारी, फुगे आदींच्या विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी या निवेदनाद्वारेकरण्यात आली आहे.
सावंतवाडी येथे पोलीस सहायक निरीक्षक योगेश जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हिंदुजनजागृती समितीचे चंद्रकांत बिले. विरेश ठाकूर, संतोष परब आदी उपस्थित होते.