आमदार दिपक केसरकर यांनी दिलेल्या निधीतून उभारण्यात येणार हायमास्ट
सावंतवाडी
माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या निधीतून कोलगांव मारुती मंदिर येथे हायमास्ट उभारण्यात येत आहे.या हायमास्ट चे भुमिपूजन कोलगांव जि.प.सदस्य मायकल डिसोजा व स्थानिक ग्रामस्थांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या आधीही कोलगांवमध्ये विकासकामांसाठी भरीव निधी हा आला आहे, येत्या काळातही मी स्वतः पुढाकार घेऊन कोलगांव साठी जास्तीत जास्त विकासकामांसाठी माझ्या जि.प. निधीतून तसेच विविध स्तरावरून विकासासाठी निधी मंजूर करुन आणेन, यापुढे कोलगांव गाव विकासाच्या दृष्टीने पुढे नेऊया असे मत जि.प.सदस्य मायकल डिसोजा यांनी यावेळी व्यक्त केले.
कोलगांव तिठा, कोलगांव चव्हाटावाडी याठिकाणी हायमास्ट बसविण्यात आले आहे. बरेच दिवस कोलगांवमधील मुख्य चौकात काळोख असायचा याचाच विचार करता हायमास्ट बसविण्यात आले आहे, ह्या भव्य हायमास्ट लँम्प मुळे कोलगांव गावाला एक वेगळेच रुप निर्माण झाले आहे.
यावेळी पं.स.सदस्य मेघश्याम काजरेकर,महिला संघटक सौ.अपर्णा कोठावळे,ज्येष्ठ दादा सावंत,माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य शिवदत्त घोगळे,उपविभागप्रमुख तथा ग्रा.पं.सदस्य संदीप(बाळू) गवस,मारीया डिमेलो, बाळा म्हापसेकर, रवींद्र आडणेकर, रामा आडणेकर, शैलेश वाडेकर, सुभाष वाडेकर, रमेश गोलतकर, महेश पटेल, साक्षी आडणेकर, ललित हरमलकर, दिनेश हरमलकर, गोविंद चव्हाण, दिलीप मिशाळ, दाजी साटेलकर यासह ग्रामस्थ उपस्थित होते.