You are currently viewing मराठी चित्रपट सृष्टीचा हिंदी स्टार आणि अँग्री यंग मॅन नाना पाटेकर काळ पडद्यावर.

मराठी चित्रपट सृष्टीचा हिंदी स्टार आणि अँग्री यंग मॅन नाना पाटेकर काळ पडद्यावर.

 

मराठी चित्रपट सृष्टीचा हिंदी स्टार असा दरारा निर्माण करत, रुपेरी पडदा आपल्या अभिनयाने पूर्णपणे रंगवणारा एकमेव मराठी माणूस म्हणजे नाना पाटेकर, ज्या काळात आपले लोकप्रिय मराठी अभिनेते हिंदीत छोटे छोटे कॅरेक्टर रोल करायचे. त्या काळात नाना पाटेकर नावाचे वादळ आपल्या चित्रपटांच्या भूमिकेतून लोक मनावर अधिराज्य गाजवायचे. त्यांच्या चित्रपटात इतर गाजलेले कलाकार असायचे तरीही सबकुछ नाना पाटेकर अशी कथेची गुंफण असायची. कारण नाना पाटेकर आपली भूमिका दमदार पद्धतीने मांडायचे. असा हा जगावेगळा कलावंत आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. अचानक नाना पाटेकर यांनी जगाचा निरोप घेऊन जगभरातल्या करोडो चित्रपट रसिकांना मानसिक धक्का दिला आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी देखील शरीराने, मनाने सुदृढ असलेला हा अभिनेता, अचानक हृदयविकाराने आपल्यातून एक्झिट घेईल असे कोणाला वाटले नव्हते. गोव्यात ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री नंतर अडीच वाजता नाना पाटेकर यांना अस्वस्थ वाटते त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवते.

हे ऐकून लोकांना जबरदस्त धक्का बसतो. ही नाना पाटेकर यांच्या लोकप्रियतेची न संपणारी पटकथा आहे.

 

एक जानेवारी १९५१ साली नाना पाटेकर यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे बालपण, शिक्षण रायगड जिल्ह्यात मुरुड जंजिरा येथे झाले. नाना यांचे वडील गजानन पाटेकर हे मुंबईत कापडाचे व्यापारी होते.

नाना पाटेकर त्यांना अशोक व दिलीप पाटेकर हे दोन थोरले भाऊ होते. बालपणी नाना पाटेकर निराश असायचे त्यांना असे वाटायचे मला चांगले रुप मिळाले नाही. म्हणून त्यांना नाट्य अभिनयाचे वेड लागले. नाना थोडे अवखळ असल्याने आई

निर्मला यांनी नानांना एक दोन वर्ष मावशीकडे ठेवले होते. दुर्दैवाने नाना तेरा वर्षाचे असताना त्यांचे वडील मृत्यूपावले. कापडाचा व्यापार आधीच थप्प झाला होता. त्यामुळे शिक्षण घेता घेता नानांना भिंतीवर चित्रपटांचे पोस्टर पेंटिंग करुन, घराला हातभार लावावा लागला. त्यानंतर नाना रेखाचित्रे काढून पोलिसांना गुन्हेगार शोधण्यात मदत करत असत, त्यातून त्यांना पैसे मिळाचे. अशाप्रकारे नाना पाटेकर यांनी गरीबीत स्वावलंबी जीवन जगले. त्यांनी मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. हे शिक्षण घेत असताना नाना पाटेकर महाविद्यालयीन नाटकात काम करू लागले. हळूहळू त्यांचा हा व्यासंग वाढला. यानंतर नानांनी प्रायोगिक रंगभूमीवर पाऊल ठेवले.

 

पुढे जाऊन नाना पाटेकर यांनी १९७८ साली “गमन” चित्रपटातून रुपेरी पडल्यावर पहिली छोटी भूमिका साकारली. ही भूमिका छोटी असल्याने ती फार लक्षवेधी ठरली नाही. त्यानंतर नाना आठ वर्ष मिळेल त्या छोट्या भूमिकांमधून रुपेरी पडद्यावर काम करत गेले. “आज की आवाज” या चित्रपटात नानांच्या भूमिकेला न्याय मिळाला पण हा चित्रपट फारसा चालला नाही. या चित्रपटाबद्दल नानूजींनी सांगितले होते. अभिनेत्री स्मिता पाटील यांनी ही भूमिका नाना पाटेकर यांना मिळवून दिली होती. १९८६ पासून नाना यांच्या चित्रपट यशाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. “एन चंद्रा” या मराठी दिग्दर्शकाने नाना पाटेकर यांना “अंकुश” हा हिंदी चित्रपट दिला. त्यात एका बेकारीग्रस्त तरुणाची भूमिका नानांनी जबरदस्त वठवली आणि देवाने नटेश्वराचे बळ या कलाकाराला बहाल केले.

या चित्रपटात “इतनी शिक्त हमें देना दाता” हे श्रद्धात्मक लोकप्रिय प्रार्थना गीत होते. त्या गीताने कदाचित नानांना उभारी दिली असावी असे वाटते. यानंतर नाना यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्यांनी सुपरहिट चित्रपटांचा नजराणा चित्रपट रसिक प्रेक्षकांना दिला. त्या प्रत्येक कलाकृतीतून नाना पाटेकर.लोकप्रिय होत गेले.

 

या सुरुवातीच्या हिंदी चित्रपटात काम करत असताना नाना पाटेकर यांनी मराठी नाटकात दमदार पाऊल ठेवले. १९७८ च्या “हमीदाबाईची कोठी” या नाटकात नाना पाटेकर यांनी लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत काम केले. अशोक सराफ त्यावेळी मराठी अभिनयातले सुपरस्टार होते. हे नाटक सुरु असताना लेखक जयवंत दळवी यांचे “पुरुष” नाटक नाना पाटेकर यांना मिळाले. या नाटकात त्यांनी खलनायक गुलाबराव ही भूमिका साकारली. त्यांच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री रीमा लागू होत्या. दोघांच्या जुगलबंदीमुळे हे नाटक सुपर डुपर हिट ठरले. या नाटकाची क्रेझ अजूनही लोक मनावर आहे परंतु नाना पाटेकर यांच्या हिंदी चित्रपटांमुळे हे नाटक त्यांना पुन्हा कधी करता आले नाही. १९९० च्या दशकातील तरुण पिढीला नानाचे हे नाटक बघता आले नाही ही या पिढीची खंत आहे. यात नानांची सकस भूमिका होती. हिंदी चित्रपटा बरोबर “सूर्योदय”, “सिंहासन”, “भालू”, “माफीचा साक्षीदार”, या काही मराठी चित्रपटातून नाना पाटेकर यांनी सुरुवातीला लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. “सूर्योदय” हा चित्रपटही नाना पाटेकर यांना सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांनी दिला होता. असे नानांनी आपल्या मुलाखतीत अनेकदा सांगितले. अशोक सराफ यांच्या बाबतीतला एक किस्साही नानू नेहमी आवर्जून सांगायचे. “हमीदाबाईची कोठी” या नाटकात लोकप्रिय स्टार म्हणून अशोक सराफ यांना प्रत्येक प्रयोगाचे चांगले मानधन मिळायचे. दिग्गज कलाकार म्हणून नाना कायम अशोक सराफ यांची मित्र म्हणून उगाच मालिश करायचे. त्या वेळी अशोक सराफ प्रत्येक वेळा नानांना एक रुपया द्यायचे नंतर त्यांनी ती रक्कम वाढली होती. कारण नानूजींना त्यावेळी कमी मानधन मिळायचे, हे लक्षात घेऊन हट्टाने अशोक सराफ पैसे द्यायचे. अजूनही नाना पाटेकर अशोकजींना भेटायचे तेव्हाही नाना त्याच प्रेमाने पैसे घ्यायचे. असा जिव्हाळा या दोघांचा कायम होता. ते ही नानांनी अनेकदा सांगितले आहे. असे भावूक नाना पाटेकर आपण सर्वांनी पाहिले आहेत.

 

असे हे नाना पाटेकर १९८०, ९० च्या दशकातले महान कलाश्रेष्ठी होते. “अंकुश” चित्रपटानंतर १९८७ साली नानांचा “प्रतिघात” चित्रपट आला, तोही चित्रपट “एन चंद्रा” यांचा होता. १९८९ मध्ये नाना पाटेकर यांचा “परिंदा” रिलीज झाला. या चित्रपटात नानांनी “आण्णा” ही खलनायकी भुमिका केली. यात नाना पाटेकर यांना उत्कृष्ट खलनायक हा पुरस्कार नामांकित पुरस्कार संस्थांकडून दिला गेला होता. अग्निसाक्षी या चित्रपटातही एक राक्षसी नवऱ्याची भूमिका नानांनी केली होती. यातही नानांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता. तर क्रांतिवीर चित्रपटात नानांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. या चित्रपटाकरता त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. “परिंदा” या चित्रपटातही त्यांना राष्ट्रीय पुरस्कार होता. त्याचप्रमाणे ह्या नानासाहेबांनी “यशवंत”, तिरंगा, “खामोशी” या काही चित्रपटात सरस भूमिका केली होती.

“खामोशी” या चित्रपटात नानांनी बोलता न येणाऱ्या बापाची भूमिका केली होती तर “तिरंगा” या चित्रपटात आपल्या भ्रष्ट राजकीय सिस्टीमला त्रासलेल्या पोलीस ऑफिसरची भूमिका अभिनेते राजकुमार यांच्यासोबत तोडीसतोड केली होती. “पिले पिले ओ मेरे राजा” हे गाणे त्याकाळी खूप लोकप्रिय झाले होते. ते नाना आणि राजकुमार यांच्यावर चित्रित झाले होते. “यशवंत” हा चित्रपट देखील राजकीय सिस्टमच्या विरोधात होता. “एक मच्छर” ही कविता त्या चित्रपटात गाजली होती. त्याला नाना पाटेकर यांचा आवाज होता. नाना पाटेकर यांनी “युगपुरुष” या चित्रपटात ट्रीटमेंट घेऊन बऱ्या झालेल्या शांत मनोरुग्णाची भूमिका केली होती. ती भूमिका प्रेक्षकांना भावुक करून गेली. त्याचबरोबर “हू तू तू”, “राजनीति”, “टॅक्सी नंबर नो दो ग्यारा”, “कोहराम”, हे हिंदी चित्रपट नाना पाटेकर यांनी गाजवले. कोहराम या चित्रपटात अमिताभ बच्चन नानांसोबत होते. थोडीशी कॉमेडी भूमिका नानूनी साकारली. वेलकम हा चित्रपट पूर्णपणे कॉमेडी होता. अशा सर्व चित्रपटात नानांनी जबरदस्त भूमिका केली. हे सर्व चित्रपट सिने रसिकांनी पाहिले आहेत.

 

अशा सर्व हिंदी चित्रपटांमध्ये कथानकाचा महानायक म्हणून नानूने महत्वपूर्ण उठावदार भूमिका केल्या. त्यामुळे नाना पाटेकर मधल्या काळात मराठीत कमी दिसले तरी त्यांनी मराठीत काही चित्रपट केले. त्यात “राघू मैना”, “सावित्री”, “गड जेजुरी जेजुरी”, “माफीचा साक्षीदार” हे नानांचे सुरुवातीचे मराठी चित्रपट होते. २००० सालानंतर नाना पाटेकर यांनी “पक पक पकाक”, “देऊळ”, “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो”, “यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची”, “नटसम्राट”, “आपला मानूस”, “ओले आले” हे चित्रपट केले. “नटसम्राट”, “डॉ. प्रकाश बाबा

आमटे”, “पक पक पकाक” या कलाकृतीमध्ये नानांनी उत्कृष्ट अभिनयाचे मान सन्मान मिळवले. नाना पाटेकर एक खडूस कलाकार म्हणून बॉलीवूड इंडस्ट्रीत प्रसिद्ध होते. नाना त्या काळात थोडे तापट स्वभावाचे झाले होते. हिंदी चित्रपटात अभिनय करायचा म्हणजे थोडा तापट स्वभाव असायला हवा. या मनोवृत्तीचे नाना पाटेकर कदाचित होते, असे आपल्याला म्हणता येईल. हा स्वभाव धर्म नाना पाटेकर यांचा असला तरी नानांनी गेल्या काही वर्षात समाजकार्यात स्वतःला झोकून दिले. नानांनी आधी रायफल शूटिंग स्पर्धेत सहभाग घेतला. काही पदके त्यांनी मिळवून भारताचे प्रतिनिधित्व केले. हे करताना नाना पाटेकर यांनी काही खेळाडूंना आर्थिक मदत दिली. यानंतर प्रकाश आमटे यांच्यासोबत हेमलकसा येथे नानांनी आदिवासी सेवा कार्यात स्वता:ला गुंतवून घेतले. हे सर्व केल्यावर नाना पाटेकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नाम फाउंडेशन ही संस्था २०१३ साली स्थापन करून महाराष्ट्रात समाज कल्याणचा नवा अध्याय सुरू केला. विधवा बायकांचे आणि वडिलांचे छत गमावलेल्या मुलांचे जीवन पाहिल्यावर त्यांना वाईट वाटायचे. या संस्थेतून ते गावागावात भरघोस आर्थिक मदत करायचे. त्याच वेळी आमिर खान यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली होती. त्यामुळे महाराष्ट्रात नानांकडून आर्थिक सहकार्य तर आमिर खान यांच्याकडून पाण्याचा मुबलक साठा ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मिळत होता. अनेक राजकीय नेत्यांबरोबर नाना पाटेकर यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते तरीही राजकीय बाबतीत चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याची ताकद नानांकडे होती. असा हा कोकणातल्या मातीत वाढलेला.दिलदार माणूस होता. नाना पाटेकर यांचे जीवन खरोखर नारळासारखे होते. वरून खडक दिसले तरी आतून ते भावूक असायचे. म्हणून त्यांचे मूळ नाव विश्वनाथ

ठेवले होते. नाना पाटेकर हे बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्या विषयी भावूक होते. यांच्या कुटूबाशी नानांचा जवळचा संबंध होता. म्हणून नानांनी बिंदू ठाकरे यांच्यासोबत अग्निसाक्षी हा चित्रपट केला होता.

 

नाना पाटेकर यांची हिंदी चित्रपट संख्या मराठीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यात त्यांनी मोहरे, अंगार, सागर संगम, सलाम बॉम्बे, थोड़ा सा रूमानी हो जाएँ, प्रहार, राजू बन गया जेंटलमैन, आंच, अब तक छप्पन, तरकीब, शक्ती: द पॉवर, गुलाम ए मुस्तफा अशा सर्व चित्रपटात नानांनी धुवाधार अभिनय साकारला. त्यांचे हे सर्व चित्रपट हिंदी, मराठी चित्रपट प्रेमींना कायम आवडत गेले.

नानांनी लहान मुलांच्या “मोगली” या कार्टून सिरीयलमध्ये “शेरखान” म्हणून दमदार आवाज दिलेला होता. नाना पाटेकर यांनी आपल्या जीवन चरित्रातून माणूस म्हणून माणसाने कसे वागावे, कसे वागू नये याचा वस्तूपाठ सर्वांना घालून दिला आहे. उमेदीच्या काळात माणूस स्वार्थी, अहंकारी असतो पण बऱ्यापैकी माणूस जीवनात परिपक्व झाल्यावर माणसाने समाजऋण फेडायचे असते. हे नाना पाटेकर यांनी जाताना सर्वांना सांगितले. एवढेच नव्हे तर आपल्या अंत्यविधी करता नानांनी लाकडे सुद्धा तोडून ठेवली होती. नाना पाटेकर हा माणूस हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीचा दुसरा अँग्री यंग मॅन होता. त्यामुळे अमिताभ बच्चन यांची तुलना नाना पाटेकर यांच्याशी सहज होऊ शकते. इतके मोठे दिग्गज कलाकार नाना पाटेकर होते. नाना पाटेकर साहेबांचा आवाज ऐकल्यावर प्रत्येक चित्रपट रसिक त्यांच्या विविधांगी भूमिकांकडे नकळत आकृष्ट व्हायचा. आज तो बुलंद आवाज आपल्यातून कायमचा निघून गेला आहे पण तो आवाज रुपेरी पडल्यावर संचिताप्रमाणे राहणार आहे. नाना पाटेकर यांच्या पश्चात पत्नी नीलकांती व मुलगा मल्हार आहेत परंतु या कलाश्रेष्ठ नानांना वैवाहिक जीवन फार काळ लाभले नाही, त्यांच्यात दुरावा कायम राहिला. नाना पाटेकर आपल्या खास शैलीत श्रोत्यांना सांगायचे, कोकणातला माणूस आत्महत्या करत नाही. कोणत्याही माणसाने आत्महत्या करू नये. काही झाले तरी माणसाने आपल्या माणसांसाठी सकारात्मक जीवन जगलेच पाहिजे, हा विचार नानांचा लाख मोलाचा आहे. हा विचार भारतीय जनतेने हृदयावर कायमचा कोरून ठेवावा.

 

अॅड रुपेश पवार

9930852165

प्रतिक्रिया व्यक्त करा