You are currently viewing आनंद जेष्ठ नागरिक संघातर्फे सदस्यांचे वाढदिवस आणि मनोरंजन कार्यक्रम संपन्न 

आनंद जेष्ठ नागरिक संघातर्फे सदस्यांचे वाढदिवस आणि मनोरंजन कार्यक्रम संपन्न 

वाकड, चिंचवड – रविवार दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी चार वाजता मासिक सभा ठेवण्यात आली. यामध्ये ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे केले. यात रेखा गिरमे, डॉ .रमेशचंद्र बियाणी, प्रतिमा कुलकर्णी, हर्षाली देसाई, सुरेखा चौधरी, सुधाकर जगताप, शोभा जोशी ,प्रकाश पानवळकर या सभासदांचे वाढदिवस साजरे केले त्यांनी संघाला देणगी दिली.

सभेच्या दुसऱ्या सत्रामध्ये मनोरंजनात्मक करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले होते.

या कार्यक्रमासाठी स्टार प्रवाह या टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध रियालिटी शो मधील “मी होणार सुपरस्टार छोटा” उस्ताद बालकलाकार कुमार प्रथमेश गायकवाड याचे सदाबहार गीत सादर करण्यात आले.

प्रथमेश गायकवाड यांच्या मुखातून दिव्य प्रतिभा संपन्न गायिकेचा आवाज ऐकायला मिळाला. हा 14 वर्षाचा मुलगा असून इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत आहे पण गायन कलेमध्ये निपुण आहे.

याच्या गाण्याचा रसस्वाद घेण्यासाठी सभागृह ज्येष्ठांनी भरून गेला होता. त्यामध्ये महिलांची संख्या जास्त होती.

छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांच्या भेटीच्या दरम्यान चा पोवाडा गायला. भारुड, गवळण, भजन, अभंग वाणी ,हिंदी व मराठी भक्ती गीत, वारीचा आनंद घेणारे गीत ,अशा प्रकारचे संगीताची मेजवानी सर्वांना दिली.

त्याच्या गाण्याच्या तालावर ज्येष्ठांचे पाय थिरकले.

या बाल कलाकारांला वाद्यांची साथ मिळाली, ते म्हणजे शिवाजी महाराज गायकवाड ,नितीन महाराज, पखवाज वादक -मुरलीधर गावडे, तबलावादक -वैभव सोळके, हार्मोनियम वादक -दादा बोडके ,यांची संगीत साथ मिळाली.

संघातील कुठलाही कार्यक्रम चांगला होण्यासाठी त्यात नियोजनबद्ध व सुसूत्रता असणे आवश्यक असते ते सांभाळणारे संघातील कारभारी व कार्यकर्ते यांची आवश्यकता असते.

संघाचे अध्यक्ष भागवत कोल्हे, उपाध्यक्ष मुरलीधर लहाने, सचिव सुरेश बोरकर, कोषाध्यक्ष माधव बरहाटे.यांचे

नियोजन आणि ज्ञानेश्वर गिरमे, श्रीकांत रेवणवार, प्रवीण कुलकर्णी ,सुभाष चौधरी ,सुभाष वाणी, नंदकुमार मोदी, या सर्वांची साथ. तसेच फोटोग्राफीमध्ये संगीता साठे व रमेश हिंगणे यांची साथ मिळाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा