You are currently viewing रोलर स्केटिंग स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड!  

रोलर स्केटिंग स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड!  

रोलर स्केटिंग स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड!

सावंतवाडी

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीची विद्यार्थीनी कु.स्पृहा नार्वेकर हिने 11वर्षे खालील वयोगट मुली या वयोगटातील Inline या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला तर कु.आयुष पोकळे याने 11 वर्षे खालील वयोगट मुले या वयोगटातील Inline या प्रकारात तृतीय क्रमांक संपादित केला.तसेच कु. शुभ्रा चव्हाण हिने 14 वर्षे खालील वयोगट मुली या वयोगटात Inline या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. या तिन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर उत्तुंग यश संपादित करून विभाग स्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान बळकट केले आहे.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत व डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर , क्रीडा शिक्षक श्री.भूषण परब तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा