You are currently viewing गणित संबोध परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे उत्तुंग यश

गणित संबोध परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे उत्तुंग यश

गणित संबोध परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे उत्तुंग यश

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित संबोध परीक्षेत उत्तुंग यश संपादित केले. गणित संबोध परीक्षेत इयत्ता पाचवी मधून 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शालेय स्तरावर कु. भूषण गावडे ,कु. आराध्या चव्हाण व कु. लिया खोबरेकर यांनी प्रत्येकी 98 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला तर कु. अर्णव माने व कु. तनुष नेरुरकर यांनी प्रत्येकी 94 गुण मिळवून द्वितीय क्रमांक संपादित केला तर कु. अनिका राऊळ हिने 90 गुण मिळवून तिसरा क्रमांक प्राप्त केला. इयत्ता पाचवी मधून 23 विद्यार्थी प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.तसेच इयत्ता आठवी मधून 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु. निशिता चव्हाण, कु. रूणाली चितारी, कु. आराध्या गावडे यांनी प्रत्येकी 90 गुण मिळवून शालेय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला तर कु. निधी राऊळ व कु स्वरा राऊळ यांनी प्रत्येकी 82 गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तसेच कु. अनय दळवी व कु. तमन्ना वाळवे यांनी 80 गुण संपादीत करून तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता आठवी मधून 30 विद्यार्थी प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणित शिक्षिका श्रीम.प्रेरणा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना गणित शिक्षिका श्रीम.फरजाना मुल्ला यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा