*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शिक्षक*
शिक्षक म्हणजे पृथ्वीवरचा
सर्वाना मार्गदर्शन करणारा
देवच असे हे कळायला हवे
शिल्पकार माणूस घडवणारा
मार्गदर्शने योग्य वाट दावितो
कोमलमनी अज्ञानबालकाना
जीवनातला उत्कृष्ट मार्गदर्शक
बनुनी सुज्ञान,सामर्थ्य देई त्यांना
आर्थिकसामर्थ्ये जरी कमी तो
गुरुविना ना कोणी भवसागर
तरितो,सन्मार्गाची वाट दावितो
शिक्षक, ज्ञानतपश्चर्येतून खडतर
पैसा पैसा करित फिरते दुनिया
पै पै करीत मास तरतो शिक्षक
ज्ञानलालसा असे मोठी त्याची
पात्रता,ज्ञानवर्धक ज्ञानसंरक्षक
समोर येई कोणतीही माती मऊ
असो चिकट,खडकाळ, कठीण
कौशल्याने सुबक मूर्ती घडविणे
हेच जीवनध्येय त्याचे असो जाण
स्वप्नगन्धा सतीश आम्बेतकर,
आर्टिस्ट.
