You are currently viewing घोटगे-येळपईवाडी येथे तालुकास्तरीय वनराई बंधारा शुभारंभ उत्साहात संपन्न

घोटगे-येळपईवाडी येथे तालुकास्तरीय वनराई बंधारा शुभारंभ उत्साहात संपन्न

घोटगे-येळपईवाडी येथे तालुकास्तरीय वनराई बंधारा शुभारंभ उत्साहात संपन्न;

भूजल पातळी वाढवण्यासाठी कच्चे बंधारे घालण्याचे उपस्थितांचे आवाहन
​

दोडामार्ग

दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत घोटगे-येळपईवाडी येथे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ‘वनराई बंधारा शुभारंभ कार्यक्रम’ मोठ्या उत्साहात पार पडला. पाण्याचे दुर्भिक्ष दूर करून भूजल पातळी वाढवण्यासाठी कच्चे बंधारे घालणे अत्यंत गरजेचे असून, या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थितांकडून करण्यात आले.
​कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती:
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास सन्माननीय सभापती, सन्माननीय उपसभापती, सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मा.सरपंच, मा.उपसरपंच, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
​उपक्रमाचे महत्त्व:
पावसाळ्यातील पाण्याचा जास्तीत जास्त साठा भूगर्भात व्हावा आणि परिसरातील भूजल पातळी उंचाववी, या उद्देशाने या वनराई बंधाऱ्याचे निर्माण हाती घेण्यात आले आहे. कच्चे बंधारे घातल्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होते तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांनाही बळकटी मिळते, असे मत यावेळी वक्त्यांनी व्यक्त केले. या तालुकास्तरीय उपक्रमाचे ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी मनःपूर्वक स्वागत केले आहे. या प्रमाणे सर्व ग्रामपंचायतीने बंधारे घालण्याचे आव्हान करण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा