You are currently viewing वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कधी निश्चित करणार?

वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कधी निश्चित करणार?

*वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कधी निश्चित करणार?*

*माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल*

सिंधुदुर्ग

पावसाअभावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीसाठी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री नितेश राणे यांनी निश्चित केले असून त्याचे नियोजन आणि आढावा जिल्हाधिकारी घेत आहेत. त्याबद्दल दुमत नाही. परंतु, महायुती सरकार आल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना रखडली आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे हाल होतात. दुष्काळाच्या काळात जलजीवन मिशन योजना देखील प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशन योजनेची रखडलेली कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कधी निश्चित करणार? असा सवाल कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.
वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत ७१८ नळयोजनेची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये जुन्या नळयोजनेच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु,नवीन नळयोजनेचे एकही काम जिल्ह्यात पूर्ण झालेले नाही. या योजेनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने निधी न दिल्याने आणि निधी नसल्यामुळे ठेकेदारांनी कामांकडे दुर्लक्ष केल्याने हि योजना अपूर्णावस्थेत आहे. या योजनेसाठी आवश्यक निधी आणण्यात पालकमंत्री, खासदार,आमदार कमी पडले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हि योजना पूर्णपणे फेल होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना याची कोणतीही काळजी नाही. त्यांनी कधीही जबाबदारीने या योजनेतील कामांचा आढावा घेतलेला नाही. हि कामे पूर्ण न झाल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत. त्यातच आता दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना याचा अधिक फटका बसणार आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले त्याचप्रमाणे जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी निश्चित करून, सरकारकडे विशेष निधीसाठी पाठपुरावा करून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी मा.आ. वैभव नाईक यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा