*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ संध्या कुलकर्णी लिखित अप्रतिम पाककृती*
*खारा*
(खास बाळंतिणीसाठी)
साहित्य-: सव्वाशे ग्रॅम सुंठ पावडर, पाव किलो खारीक पावडर, 1 चमचा मिरे, 1 जायफळ, 1 वाटी खोबरे, तुप, पिठीसाखर 1/2 किलो (चवीनुसार ), 1 छोटी वाटी खसखस
कृती-: तुपात सुंठ पावडर भाजून घेणे.नंतर खोबरे किसून भाजणे.मिरे तुपात भाजून घेणे. जायफळ कुटुन तुपात भाजून घेणे.खसखस भाजून घेणे. खारीक पावडर तुपात परतुन घेणे.वरील सर्व गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेऊन त्यात चवीनुसार पिठीसाखर मिक्स करून घ्या व डब्यात भरून ठेवा.रोज सकाळी 2-3 चमचे ही पावडर वाटीत घेऊन त्यात जास्त तुप घालून पेस्ट करून चमच्याने खाणे. खास बाळंतिणीसाठी खुप छान च👌😋 व पौष्टिक.
ता क -: सगळ्यांसाठी पण चांगले फक्त तब्येत बघून खावे.थंडीत उपयुक्त…
सौ.संध्या कुलकर्णी. ..सातारा.
