You are currently viewing पत्ता नाही मी विसरणार

पत्ता नाही मी विसरणार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पत्ता नाही मी विसरणार*

 

उलटून गेली त्र्याहात्तर वर्षे

नात्यात गुंतलो नकळत

भरून चुडा तुझ्या नावाचा

भिजलो आपण वरूण सरीत

//1//

रोज पकडून डोंबिवली फास्ट

केली आपण चैन जीवाची

आल्या अडचणी जरी कधी

मदत मिळायची शेजाऱ्यांची

//2//

नव्हती तक्रार कधी तुझी

असून माझी नोकरी शाळेची

कापरासारखे सरले दिवस

सर न आली डोंबिवलीची

//3//

होता आजाराची मैत्री घट्ट

देऊन झाला भरपूर त्रास

आले देता *अमूल्य दान*

करता करता स्वर्ग प्रवास

//4//

कशाला ठेवता घास कावळ्याला

सर्व चाललय माझं ठीक

दान करावं धान्य बँकेला

गरजू न मागतील भीक

//5//

करू साजरा दणक्यात आपण

येईना पकडून गाडी मोकळी

अखुया बेत साधासुधा

करून फक्त शिक्रण पोळी

//6//

भरवा गाईला भरपूर चारा

नका घालू कुणी शिजवलेले

वरदान आहे त्यांना तसे

आठवते मज शाळेत शिकवलेले

//7//

आजी येणार आज पहाटे

सांगून ठेवा माझ्या नातीला

फोनवर बोलल्ये तसे सुनेला

लवकर लागेल मला परतायला

//8//

संपलाय सोस आता वस्त्रांचा

नेसून येईन गुलाबी साडी

पाठवू नका कुणी कुरियरने

पुष्पगुच्छ आणि वस्तु महागडी

//9//

असते गर्दी फार यायला

*त्यातून गर्दीचा रविवार*

सवय आहे मला जुनी

*पत्ता नाही मी विसरणार*

 

तुझीच

*अ ल का*

प्रतिक्रिया व्यक्त करा