जिथे हरवत माणुसकीच भान त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान- रवी जाधव
सावंतवाडी
रुग्ण व निराधारांचा आधारवड असणारी सावंतवाडी शहरातील नावलौकिक संस्था म्हणजेचं सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान.
आज खऱ्या अर्थाने माणुसकी आणि माणूस जिवंत ठेवण्याचे पवित्र काम ही संस्था करताना दिसते.
या नोंदणीकृत संस्थेमध्ये 15 मेंबर आहेत त्यातील या चार रणरागिणी रूपा मुद्राळे, समीरा खलील, हेलन निबरे व शरदनी बागवे आपलं कुटुंब सांभाळून प्रसंगी कुठच्याही वेळी येथील प्रत्येकाच्या संकटामध्ये ज्या पद्धतीने संस्थेतील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात ते वाखण्याजोगे व अभिमान वाटावा असंच त्यांच काम आहे.
या संस्थेच्या रूपा मुद्राळे 1995 पासून ते आज तगायत सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने काम करत आहे असं काम सहसा कोणीच करू शकत नाही.
रस्त्यावर होणारे अपघात त्या त्यावेळी अपघात ग्रस्त व्यक्तीला रुग्णाला दाखल करणे तर एखाद्या महिलेने केलेल्या आत्महत्येच्या वेळी किंवा अपघाताप्रसंगी रात्री रात्रीचे बारा वाजले किंवा एक तत्काल परिस्थितीमध्ये पोस्टमॉर्टम रूम मध्ये तासंतास त्या बॉडीच्या बाजूला उभ राहून पोलिसांना सहकार्य करणे तसेच निराधार मृत व्यक्तीला स्मशानभूमी मध्ये जाऊन अग्नी देणे, अक्षरशः कुजलेल्या मृतदेहा प्रसंगी इतरांसोबत राहून त्याच्या अंतिम विधी पर्यंत मदत करणे हे काम तेवढं सोपं नाही अशी कामे तिने कित्येक वेळा केली आहे.
त्याचप्रमाणे संस्थेच्या सचिव समीरा खलील व हेलन निबरे याच पद्धतीने सेवाभावी काम करत आहे खरंच हे गुण त्यांच्या अंगी नैसर्गिकच आहेत हे त्यांच्या या निस्वार्थी सेवाभावी कामावरून दिसून येतं.
आज पर्यंत त्यांनी रस्त्यावर भटकणाऱ्या अनेक निराधारांचा नुसताच आधार नाही तर त्यांचे नातेवाईक बनून स्वतःकडील पैसे खर्च करून निराधारांना आश्रय मिळवून देतात. जिल्ह्यातील सविता आश्रम, तसेच जिव्हाळा सेवा आश्रम अशा अनेक सेवाभावी आश्रमांना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून शक्य होईल तेवढी मदत दरवर्षी दिली जाते याची जाणीव ठेवून हे आश्रम सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला नेहमी सहकार्य करतात तसेच
सावंतवाडी शहरातील या अगोदर होऊन गेलेले पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला खूपच मदत केली होती परंतु नुकताच सावंतवाडी पोलीस स्टेशनचा पदभार सांभाळणारे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे सहकार्य सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला चांगल्या पद्धतीने लाभले आहे त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सुद्धा त्यांना मदत करत आहे.
