*बसमध्ये चक्कर येऊन कोसळलेल्या 80 वर्षीय वृद्धेला तात्काळ उपचार – प्रकृती स्थिर*
*सावंतवाडी, माजगाव* –
आनंदी शशिकांत परिंकर (वय 80, रा. मोरगाव टाकवाडी, ता. सावंतवाडी) या वयोवृद्ध महिला आज मोरगावहून आपल्या राहत्या घरामधून सावंतवाडीला एसटी बसने येत असताना माजगाव एसटी स्टॉपजवळ बसमध्येच चक्कर येऊन कोसळल्या.
बस कंडक्टर, एसटी कर्मचारी व प्रवाशांनी प्रसंगावधान राखून त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याने डॉ. मयूर. सुळेभावकर, डॉ. सभा लाडखान परिचारिका गावडे यांनी प्राथमिक उपचार करून सिटीस्कॅन करण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
त्यांची माया मुलगी मुंबईत असल्याने जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी त्यांच्या मोबाईलवरून मुलीला कल्पना दिली व पोलिसांना माहिती दिली. सिटीस्कॅन रिपोर्ट व उपचारासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर व आरोग्य कर्मचारी सुजित देसाई परिचारिका मानसी गावडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
–
