You are currently viewing ना. नितेश राणे यांचे कुणकेश्वरवासीयांनी केले अभिनंदन.. !
Oplus_16908288

ना. नितेश राणे यांचे कुणकेश्वरवासीयांनी केले अभिनंदन.. !

“मंत्री नितेश राणे आगे आगे बढो हम तुम्हारे साथ है..!” दिल्या घोषणा

*‘ट्री ऑफ लाईफ’च्या ५० खोल्यांच्या आलिशान ताज हॉटेलसाठी करारानंतर ग्रामस्थांनी केला आनंद व्यक्त*

देवगड : ताज प्रकल्पामुळे श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या पर्यटन विकासाला आणखी चालना मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. कुणकेश्वर येथे ‘ट्री ऑफ लाईफ’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या ५० खोल्यांच्या आलिशान हॉटेलची उभारणी करण्यात येणार असून, यासंदर्भातील करार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कुणकेश्वरच्या पर्यटन क्षेत्राला नवी झळाळी मिळण्यासह पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त केली.

कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येत मंत्री नितेश राणे यांच्या निर्णयाचे स्वागत केले व आभार मानले यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली,गणेश चव्हाण,दिलीप चव्हाण,प्रवीण चव्हाण,श्रीकृष्ण बोंडाळे,चंद्रकांत घाडी,सुभाष तेली,सतीश तेली,मनोज आंबेरकर,राजीव बोंडाळे,प्रमोद चव्हाण आदी उपस्थित होते.

देवगड-कणकवली-वैभववाडी मतदारसंघाचे आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या पुढाकारातून कुणकेश्वरच्या पर्यटन विकासासाठी विविध प्रकल्पांना चालना दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ५० खोल्यांच्या या आलिशान हॉटेलच्या प्रकल्पासाठी झालेला करार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. असे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पामुळे कुणकेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार निवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, स्थानिक पर्यटन व्यवसायालाही त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. हॉटेल प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासह विविध व्यवसायांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

कुणकेश्वर परिसरातील पर्यटनाचा विकास व्हावा, अधिकाधिक पर्यटक या परिसराकडे आकर्षित व्हावेत आणि स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार नितेश राणे सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आमदार तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे कुणकेश्वरवासीय, कुणकेश्वर भारतीय जनता पार्टी आणि ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. भविष्यातही अशाच प्रकारचे विविध पर्यटनविषयक प्रकल्प कुणकेश्वरमध्ये आणून या परिसराच्या पर्यटन विकासाला अधिक गती द्यावी, अशी अपेक्षाही ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.

कुणकेश्वरच्या पर्यटन विकासासाठी झालेल्या या करारामुळे परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, आगामी काळात कुणकेश्वर हे पर्यटनाच्या नकाशावर आणखी ठळकपणे अधोरेखित होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा