*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आनंदासाठीच रे जगावे*
आनंदासाठीच ते जगणे असावे
जगण्यात आनंद माना, सुखाचा
क्षण आपणच जाणा, प्रयत्नांती
परमेश्वर, कण रगडावा दुःखाचा
/1/
सुखदुःख या छटा असती जीवनी
तरी प्रत्येक क्षण हा उनपावसाचा
नका मनीठेवूभीती,संकटवादळाची
येती क्षणात जाती,संकेत जीवनाचा
/2/
मनी ठेवुनिस्वप्ने जगा तुम्हीआनंदात
व्यर्थ रडण्यात सांगा काय अर्थआहे
कर्म करावे नेटके,नको दु:ख कुणा
नसते कुणीकुणाचे जोतो स्वार्थपाहे
/3/
प्रत्येक मानवास आहेत दु:ख भारी
कशास सांगावी कथा आपली ती
जमेल ते परी, सहकार्य करीतजावे
फळाची का अपेक्षा मनी ठेवावी ती
/4/
आनंदाचे झाड लावा दारी जरीफुले
पडतील शेजारच्या अंगणी, सुवास
दरवळे परिसरी सर्वत्र तेच सत्कार्य
नकळत होई निस्वार्थ तेभावे देवास
/5/
आयुष्याचाकॅनव्हास असे जरीकोरा
जन्मा येताच तो भरतोच पेपर सारा
काही उत्तरे बरोबर काहीहोती चुका
दुरुस्तीच्या पश्चातापाने करा निचरा
/6/
जीवनी जोडीत जावी सद्गुणांचीगती
सत्संग शोधित फिरावे, गुण वेचावे
दु:ख दूर सारावे, निर्मळ मनानेजगी
पहावे,सुगंधे फुलावे आनंदगीतगावे
/7/
स्वप्नगन्धा सतीश आम्बेतकर,
आर्टिस्ट.
