सिंधुदुर्ग :
खाद्य तेलाच्या किंमतीने दिवसेंदिवस उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य, शेतकरी वर्ग, ग्रामीण भागातील मजूर हा महागाईचा भडका उडाल्याने हैराण झालेला असून त्यांच्या दैनंदिन जीवनावर महागाईच्या भडका उडाल्याने मोठा परिणाम जाणवत आहे.
लॉकडाऊन च्या आधी पाम तेल डब्बा १५ कि ७०० ग्रॅमचा हा ५०० रुपये एवढ्या किमतीला मिळत असे प्रत्येक महिन्याला वीस ते शंभर रुपये एवढे सतत खाद्य तेलाच्या दरात वाढ होत गेली. पामतेलाच्या साडेपाचशेचा तेल डब्बा आता चक्क १८०० (अठराशे रुपया) ला झाला असून शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन २३०० रुपयांच्या वरती खाद्यतेल डब्याची किंमत गेली आहे .
सर्वसामान्य गरीब कुटुंबातला नागरिक जास्त करून पाम तेलाची खरेदी करत असतो. आणि तो पाम तेलाचा एक लीटर चा पुडा ४८ ते ५२ रुपयाला मिळणार आता १३५ रुपयाला मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या जीवनावर परिणाम झालेला असून रोजच्या वापरातल्या घर वस्तू ही महाग झाले आहेत. त्याचा परिणाम कष्टकरी, शेतकरी, मजूर गरीब नागरिकांच्या जीवावर होत आहे. त्याच प्रमाणे पेट्रोलच्या दरात भडका उडाल्याने शंभरीच्या जवळपास पेट्रोल गेल्याने अनेक सर्वसामान्य दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू महागल्या आहेत.
सर्वसामान्य कुटुंबातील जीवन विस्कळीत झाले असून गरीब, मजूर हातावरचे पोट असणाऱ्या लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या सर्व गोष्टीला जबाबदार कोण ? कुत्रिम महागाई निर्माण केली गेली का ? मानवनिर्मित महागाई आहे नेमकं याच्या पाठीमागे कोण आहे ? नेमका कुठल्या कारणामुळे खाद्य तेलाचे दर गगनाला भिडले आहेत हे सर्वसामान्य जनतेला कळायला मार्ग नाही.
पेट्रोलच्या दरात भडका उडाल्याने कधी महाराष्ट्र शासन केंद्र शासनावर व केंद्र शासन महाराष्ट्र शासनावर टोलवाटोलवी मुळे सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाली असून गरिबांचे मात्र कंबरडे मोडले आहे. या महागाईत खूप मोठा परिणाम सर्वसामान्य शेतकरी आणि मजूर लोकांवर होत आहे. संबंधित महागाईच्या विरोधात सर्वसामान्य जनता आक्रोश करत असून जर हा आक्रोश बांध फुटला आणि जनतेचा आक्रोशाचा भडका उडाला तर सरकारला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे. अनेक सामाजिक संघटना महागाईच्या विरोधात आंदोलनास तयार आहेत असे अशीही माहिती मिळत आहे.