You are currently viewing सुशला

सुशला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ संध्या कुलकर्णी लिखित पाककृती*

 

*सुशला*

 

*साहित्य:* चुरमुरे, कांदा, टोमॅटो, कोथंबीर, हिरवी मिरची, डाळ, तेल, साखर, ओले खोबरे, लिंबू.

 

*कृती*: चुरमुरे पाण्यात घालून लगेच हाताने पिळून बाजूला ठेवायचे. नंतर कांदा, टोमॅटो चिरून ठेवणे. मिक्सर मधून मुठभर डाळ व हिरवी मिरची चवी प्रमाणे भरड करुन घ्या. नंतर कढईत तेल घालून फोडणी करून कांदा टोमॅटो परतून त्यात चुरमुरे घाला व त्यात ती भरड घाला. मीठ, थोडीच साखर, लिंबू पिळा. हलवून झाकण ठेवा. २_३ वाफ आली की वरून कोथींबीर व ओले खोबरे घालून खाण्यास घ्या. गरम गरम छान लागते….

 

😋😋

सौ.संध्या कुलकर्णी…..सातारा.

प्रतिक्रिया व्यक्त करा