You are currently viewing “शाळा तिथे मुख्याध्यापक पद” हे सुत्र लागु करण्याची शिक्षक भारतीची पालकमंत्री यांच्याकडे मागणी…

“शाळा तिथे मुख्याध्यापक पद” हे सुत्र लागु करण्याची शिक्षक भारतीची पालकमंत्री यांच्याकडे मागणी…

पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देऊन एकमुखी मागणी

सिंधुदुर्ग

दि.२८/८/२०१५च्या निर्णयामुळे विद्यार्थी पटसंख्येअभावी ज्या शाळेचे मुख्याध्यापक पद व्यपगत झाले आहे.त्या प्रत्येक माध्यमिक शाळेला “शाळा तिथे मुख्याध्यापक पद” हे अत्यावश्यक सूत्र लागु करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष तथा राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर,सचिव सुरेश चौकेकर कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सोमवारी सिंधुदुर्गनगरी येथील सभेत निवेदन देऊन त्यांनी एकमुखी मागणी केली आहे.
याप्रसंगी शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हा पदाधिकारी उपाध्यक्ष डी.एस.पाटील, दत्तात्रय मारकड, शिवाजी वांद्रे, कणकली तालुका कार्याध्यक्ष एस.डी.भोसले, वैभववाडी तालुका अध्यक्ष अविनाश कांबळे,सचिव स्वप्निल पाटील,यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात शिक्षक भारती संघटनेने पुढील मुद्द्यावर पालकमंत्री यांचे लक्ष वेधले असुन त्यांच्या माध्यमातून संघठनेची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्वव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.

संघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे-

महाराष्ट्र राज्य शिक्षण आणि शिक्षकांबाबत अतिमहत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेताना काही बाबींचा विचार होण्याची विनंती शिक्षक भारतीने केली आहे.
या चुकीच्या निर्णयामुळे शाळास्तरावर शिक्षण व शिक्षण क्षेत्राशी माध्यमिक विभागातील शालेय कामकाज सुरळीतपणे पार पाडणे जिकरीचे झाले आहे. या निर्णयाचा फटका फक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नव्हे तर विद्यार्थ्यांना बसत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.आपल्या स्तरावरुन तातडीने पुढील निर्णयाबाबत उचित कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.

शाळा तिथे शारीरिक शिक्षण शिक्षकपद मंजुर व्हावे-

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास साधण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी ‘शाळा तिथे शारीरिक शिक्षण शिक्षक’ पदला तातडीने मंजूरी दिली जावी.

११डिसेंबरचा शिक्षकेतर कर्मचारी संदर्भातील शासन निर्णय रद्द करावा

११डिसेंबरचा शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी संदर्भातील शासन निर्णय त्वरित रद्द करून पूर्वीप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आकृतिबंध लागू करावा अशीही मागणी या निवेदनात केली आहे.

शाळांना अनुदान देताना २०टक्के अनुदानित शाळांना तपासणीच्या फे-यात अडकवून न ठेवता नियमानुसार थेट ४०टक्के अनुदान मंजुर करावे.

डोंगरी व आदिवासी भागासाठी २८/८/२०१५
पुर्वीची तरतूद पुन्हा लागु करावी .
टीईटी उत्तीर्ण शिक्षकांना सेवेत कायम करावे यासारख्या अनेक मागण्यांचे निवेदन शिक्षक भारतीने देत पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत यातील महत्त्वाच्या मुद्दयावर चर्चा केली.

सिंधुदुर्गनगरी: शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना सोबत सचिव सुरेश चौकेकर कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर राज्य प्रतिनिधी सी.डी. चव्हाण व अन्य पदाधिकारी

प्रतिक्रिया व्यक्त करा